शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

लाहोरी बारचा परवाना रद्द

By admin | Updated: December 28, 2016 03:24 IST

गुन्हेगारांशी वाद घालत हाणामारी तसेच गोळीबार करणाऱ्या बार संचालकाने नियमभंग केल्याचा ठपका ठेवत

 नागपूर : गुन्हेगारांशी वाद घालत हाणामारी तसेच गोळीबार करणाऱ्या बार संचालकाने नियमभंग केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी मंगळवारी धरमपेठेतील बहुचर्चित लाहोरी डिलक्स बार अ‍ॅन्ड रेस्टॉरंटचा परवाना रद्द केला. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसात दोन बार मालकांना दणका दिल्याने शहरात मनमानीपद्धतीने बार-रेस्टॉरंट चालविणाऱ्या मद्यालयाच्या संचालकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी कुर्वे यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, अनुज्ञप्तीधारकाने मुंबई विदेशी मद्य नियम १९५३ मधील नियम ४९ नुसार शासनाने प्रदान केलेली अनुज्ञप्ती स्वत: अथवा नोकरनामाधारकास व्यक्तीच्या वतीने योग्य पद्धतीने चालविणे आवश्यक आहे. गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तीला बार चालविण्यास दिला जाऊ शकत नाही. मात्र, अनुज्ञप्ती(क्रमांक ४४)धारक समीर शर्मा हा बार आणि रेस्टॉरंट चालविताना मुंबई दारूबंदी कायदा १९५३ चे कलम ४९ चे उल्लंघन करीत असल्याचे निदर्शनास आले. तसा अहवालही पोलीस आणि अबकारी खात्याकडून मिळाला. एवढेच नव्हे तर तेथे १३ नोव्हेंबरच्या रात्री गुंडांच्या एका टोळक्यासोबत बारमधील कर्मचाऱ्यांचा जोरदार वाद झाला. त्यानंतर कुख्यात शेखू टोळीने तेथे येऊन धुडगूस घातला. वाहनांची तोडफोड केली. दगडफेक करून गोळीबार केला. बार संचालक समीर शर्मानेही गोळीबार केला. कुणालाही गोळी लागली नाही त्यामुळे जीवितहानी टळली. मात्र, गोळीबाराच्या घटनेने तेथे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी दोन्हीकडून तक्रारी नोंदविण्यात आल्यामुळे सीताबर्डी पोलिसांनी कुख्यात शेखू, पप्पू डागोर तसेच त्याचे साथीदार आणि लाहोरीचा संचालक समीर शर्मा आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. काहींना अटकही केली. पोलिसांनी त्यांचा चौकशी अहवालात परवानाधारकाने गंभीर नियमभंग केल्याचा निष्कर्ष नोंदवला. लाहोरीच्या आत-बाहेर नेहमीच हाणामारीच्या घटना घडतात. अनेकदा तेथे तोडफोडही झाली आहे, असेही पोलिसांच्या अहवालात नमूद आहे. त्यावरून लाहोरी डिलक्स बारची अनुज्ञप्ती रद्द करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी कुर्वे यांनी आज जारी केलेल्या आदेशातून स्पष्ट केले आहे.(प्रतिनिधी) अनेक ठिकाणी हप्ताखोरी शासनाने बार आणि रेस्टॉरंटच्या संचालकांना वेळ ठरवून दिली आहे. मात्र, शहरातील अनेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बार संचालक अटी-शर्तींचे उल्लंघन करून पहाटेपर्यंत बार चालवितात. पोलिसांच्या हप्ताखोरी वृत्तीमुळेच हे होते. दरम्यान, सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी क्लाऊड सेव्हन बार अ‍ॅन्ड रेस्टॉरंटचा परवाना रद्द केला तर, त्याच्या २४ तासानंतर जिल्हाधिकारी कुर्वे यांनी लाहोरीला दणका दिला. त्यामुळे पहाटेपर्यंत सेवा देणाऱ्या बार संचालकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.