शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

‘लेडी चिटर’ हॉटेलमधून थेट तुरुंगात!

By admin | Updated: October 22, 2016 02:32 IST

बोगस ओळखपत्राच्या मदतीने एक तरुणी महिनाभरापासून रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉर्इंट येथे थांबली होती.

नागपूर : बोगस ओळखपत्राच्या मदतीने एक तरुणी महिनाभरापासून रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉर्इंट येथे थांबली होती. वारंवार तगादा लावूनही ती खोलीचे भाडे जमा करण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने हॉटेल व्यवस्थापनाला तिच्यावर संशय आला. व्यवस्थापनाने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांच्या सक्रियतेने तिचे पितळ उघले पडले. पूजा ठक्कर ऊर्फ पूजा खान (२७) रा. जुहू मुंबई असे आरोपी तरुणीचे नाव आहे. पूजा २३ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता हॉटेल सेंटर पॉर्इंट येथे आली. तिने स्वत:ची ओळख इंटरनॅशनल कौन्सिल आॅफ ज्युरीचे सदस्य असल्याचे करून दिली. स्वत:चे ओळखपत्र दाखवून हॉटेलमध्ये खोली बुक केली. हॉटेलच्या अधिकाऱ्यांनी नियमानुसार पूजाकडून ‘अ‍ॅडव्हान्स’सुद्धा घेतला नाही. पूजा ही विधी सेवेची अधिकारी असल्याचे हॉटेलच्या अधिकाऱ्यांना वाटले. त्यामुळे त्यांनी तिच्यावर ‘अ‍ॅडव्हान्स’साठी दबाव टाकणे योग्य समजले नाही. आयपीएसशी झाले लग्न नागपूर: मधल्या काळात पूजा पुण्याला गेली. तेथून परत आल्यावर हॉटेलच्या व्यवस्थापकांनी तिला हॉटेलचे बिल भरण्यास सांगितले. तेव्हा हॉटेलच्या खात्यात आॅनलाईन रक्कम जमा करण्यात आल्याचे पूजाने सांगितले. परंतु नंतर रक्कम जमा झाली नसल्याचे लक्षात आल्यावर हॉटेल व्यवस्थापकांनी तिला पुन्हा पैसे भरण्यास सांगितले. वारंवार तगादा लावूनही पूजा पैसे भरण्यास टाळाटाळ करू लागली. पूजाचे प्रभावशाली व्यक्तित्त्व आणि वाक्पटुतेमुळे हॉटेलचे अधिकारी तिला सामना करू शकत नव्हते. पूजा पैसे भरत नसल्याने तिला हॉटेल खाली करण्यास सांगण्यात आले. तेव्हा पूजा आणखीनच संतापली. तिने हॉटेल व्यवस्थापकांना गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली. प्रशासनात आणि पोलीस विभागातील अनेक अधिकाऱ्यांशी आपली ओळख असल्याचे सांगत तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली. या दरम्यान हॉटेलच्या अधिकाऱ्यांनी पूजाची माहिती काढण्यास सुरुवात केली तेव्हा पूजाचा खरा चेहरा उघडकीस आला. पूजाचे ओळखपत्र बोगस असल्याचे आढळून आले. खूप शोध घेतल्यानंतर पूजाविरुद्ध उत्तराखंडमधील मसुरी आणि मुंबईत फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याची बाब उघडकीस आली. मुंबईत ती सीबीआय अधिकारी म्हणून लाल दिव्याच्या गाडीत फिरत होती. गुरुवारी हॉटेलच्या व्यवस्थापक निधी नायर यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पूजाला शुक्रवारी सकाळी अटक केली. पूजा ही नवरात्रीसाठी नागपुरात आल्याचे सांगत आहे. सूत्रानुसार नीलेश ठक्कर याच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर पूजाने जुलै महिन्यात एका सेवानिवृत्त आयपीएसशी लग्न केले आहे. त्यामुळे ती पूजा खान म्हणून सुद्धा स्वत:ची ओळख सांगते. लग्नाच्या दोन महिन्यानंतरच ती पतीपासून वेगळी राहत आहे. यासंदर्भात विचारणा केली असता ती काहीही सांगत नाही. हॉटेलमध्ये स्पा चालवणाऱ्या महिलेकडूनही पूजाने मोठ्या प्रमाणात वस्तू खरेदी केल्या आहेत. तसेच टॅक्सीचालकाचेही बिल शिल्लक असल्याचे सांगितले जाते. (प्रतिनिधी)