शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील फायर कॉलेजमध्ये तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 11:13 IST

गेल्या तीन वर्षांपासून बीई फायर इंजिनिअरिंग कोर्स संचालित करण्यात येत आहे. तांत्रिक शिक्षणासाठी जुळलेल्या या अभ्यासक्रमासाठी महत्त्वाचे असलेले तांत्रिक मॉड्युल अजूनही तयार केलेले नाही, शिवाय तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.

ठळक मुद्देतांत्रिक मॉड्युलचे कार्य अपूर्ण अनेक उपकरणे नाहीत

वसीम कुरैशी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय गृहमंत्रालयाचे देशातील एकमेव आणि मोठ्या फायर कॉलेजचे बांधकाम उपराजधनीत गेल्या सहा वर्षांपासून सुरू आहे. गेल्या तीन वर्षांपासून बीई फायर इंजिनिअरिंग कोर्स संचालित करण्यात येत आहे. तांत्रिक शिक्षणासाठी जुळलेल्या या अभ्यासक्रमासाठी महत्त्वाचे असलेले तांत्रिक मॉड्युल अजूनही तयार केलेले नाही, शिवाय तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.फायर फायटिंग, बचाव व आपदा स्थिती निर्माण करण्याच्या उद्देशाने येथे मॉड्युल तयार करण्यात येणार आहे. त्याकरिता हेलिपॅडची निर्मिती केली आहे, पण हेलिकॉप्टर नाही. एक इमारत तयार असून, ती रिक्त आहे. रेल्वेचे डबेही नाहीत. याशिवाय दुर्घटना आणि आपदा स्थिती दर्शविणारी व्यवस्था अजूनही पूर्ण झालेली नाही. अशास्थितीत या कॉलेजमध्ये बीई फायर इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षाचे (चौथे वर्ष) विद्यार्थी शिकत आहेत. विद्यार्थ्यांकडून फी आणि होस्टेलचे शुल्क वसूल करण्यात येत आहेत, पण तांत्रिक पैलूंच्या कमतरतेमुळे त्यांचे शिक्षण अपुरे समजले जाईल. कॉलेजमध्ये तांत्रिक सल्ल्यासाठी नेदरलँडची कंपनी ‘फाल्क’ला पाच कोटींच्या कंत्राटावर सल्लागार नियुक्त केले होते. या कंपनीने अर्धवट काम करून पलायन केले आहे. पायाभूत सुविधा पूर्ण होण्यापूर्वीच ‘फाल्क’ची मदत घेणे चुकीचे ठरल्याचे सूत्रांनी सांगितले.देशात कुठेही बीई फायर इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम नाही. त्यानंतरही कॉलेजमधील तांत्रिक त्रुटी अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रभावित करीत आहेत. सद्यस्थितीत कॉलेजमध्ये ३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

कॉलेजच्या कामाला वेगप्राप्त फंडातून प्रयोगशाळेसाठी उपकरणे आणि अ‍ॅम्ब्युलन्स आणण्यात आली आहे. तांत्रिक मॉड्युलकरिता या महिन्यात निविदा निघणार आहे. कॉलेजला विभिन्न कामासाठी मिळालेला निधी पूर्णपणे खर्च करण्यात येत आहे. त्यामुळे कामात आता वेग आला आहे.- जी.एस. सैनी,संचालक (प्रशासन), एनएफएससी.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र