शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

कोरोना नमुने वितरणात व्यवस्थापनाचा अभाव : हायकोर्टात अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 21:30 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कोरोना संशयित रुग्णांचे नमुने सर्व प्रयोगशाळांना सारख्या संख्येत वितरित करण्याचे विभागीय आयुक्तांना निर्देश दिले होते. त्या निर्देशाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली नाही. कोरोना नमुने वितरणात व्यवस्थापनाचा अभाव आहे, अशी माहिती न्यायालय मित्र अ‍ॅॅड. अनुप गिल्डा यांनी उच्च न्यायालयाला दिली आहे.

ठळक मुद्देअहवाल लवकर येत नाही, रुग्णांना मनस्ताप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कोरोना संशयित रुग्णांचे नमुने सर्व प्रयोगशाळांना सारख्या संख्येत वितरित करण्याचे विभागीय आयुक्तांना निर्देश दिले होते. त्या निर्देशाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली नाही. कोरोना नमुने वितरणात व्यवस्थापनाचा अभाव आहे, अशी माहिती न्यायालय मित्र अ‍ॅॅड. अनुप गिल्डा यांनी उच्च न्यायालयाला दिली आहे. त्यांनी यासंदर्भात अर्ज दाखल केला आहे.उच्च न्यायालयाने गेल्या २३ एप्रिल रोजी संबंधित निर्देश दिले होते. त्यानंतर कोरोना संशयित रुग्णांचे नमुने सर्व प्रयोगशाळांना सारख्या संख्येत वितरित करण्याची जबाबदारी मेयो रुग्णालयाकडे सोपविण्यात आली. त्यासंदर्भात केवळ फोनवर आदेश देण्यात आले. न्यायालयाच्या निर्देशाचे काटेकोर पालन केले जात नाही. बहुतेक नमुने मेयो रुग्णालयातच ठेवले जातात. नमुन्यांचा अहवाल लवकर येत नाही. परिणामी, सुटीसाठी पात्र असलेल्या रुग्णांना क्वारंटाईन रहावे लागते. त्याचा रुग्णांना मनस्ताप होत आहे. करिता, न्यायालयाने यासंदर्भात आवश्यक आदेश द्यावे, अशी विनंती अ‍ॅड. गिल्डा यांनी केली आहे.चंद्रपूर, यवतमाळ, गोंदियाला प्रयोगशाळेची प्रतीक्षाचंद्रपूर, यवतमाळ व गोंदिया येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये अद्याप कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू झाली नाही याकडेही अ‍ॅड. गिल्डा यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले आहे. २३ मार्च रोजी उच्च न्यायालयाने या तिन्ही ठिकाणी दोन आठवड्यात प्रयोगशाळा सुरू करण्याचा आदेश दिला होता. परंतु, या तिन्ही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढत असतानाही तातडीने प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या नाहीत. चंद्रपूरची आरटी-पीसीआर मशीन जळगावला वळविण्यात आली. गोंदियासाठी खरेदी करण्यात आलेली आरटी-पीसीआर मशीन प्रयोगशाळेत लावण्यात आली नाही. यवतमाळ येथे मशीन लावण्यात आली, पण ती मशीन कार्यान्वित झाली नाही. परिणामी, न्यायालयाने यासंदर्भातही आवश्यक निर्देश द्यावे, असे अर्जात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्या