शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

जनगणनेअभावी ओबीसी समाजाची पीछेहाट : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 20:56 IST

ओबीसी समाजाची जनगणना न केल्यामुळे केंद्राकडून ओबीसींना तुटपुंजे आर्थिक साहाय्य मिळते. त्याचा परिणाम ओबीसींच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासावर झाला

ठळक मुद्देसंविधान चौकात धरणे आंदोलन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शासनाकडे १९३१ पासून सातत्याने मागणी करूनही ओबीसी समाजाची जनगणना करण्यासाठी शासनाने उदासीनता दाखविली आहे. ओबीसी समाजाची जनगणना न केल्यामुळे केंद्राकडून ओबीसींना तुटपुंजे आर्थिक साहाय्य मिळते. त्याचा परिणाम ओबीसींच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासावर झाला असून शासनाने ओबीसींची जनगणना करावी, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी संविधान चौकात आयोजित धरणे आंदोलनाद्वारे केली.राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने ओबीसींच्या जनगणनेच्या मागणीसाठी संविधान चौकात धरणे आंदोलनाचे आयोजन केले. आंदोलनात महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, शरद वानखेडे, गुणेश्वर आरीकर, अतुल लोंढे, सुषमा भड, कल्पना मानकर, अ‍ॅड. रेखा बाराहाते, कुंदा ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी ओबीसी समाजाची पीछेहाट झाली असून, शासनाने ओबीसींची जनगणना करून समाजाला न्याय देण्याची मागणी केली. सर्व राज्याला मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांनी ओबीसी जनगणनेचा ठराव पारित करण्याचे आवाहन त्यांनी केले. जावेद पाशा यांनी सीएए आणि एनआरसीला विरोध दर्शवून हा कायदा रद्द करण्याची मागणी केली. अतुल लोंढे यांनी आर्थिक परिवर्तनाच्या दृष्टीने ओबीसींची जनगणना महत्त्वाची असल्याचे सांगितले. केंद्र शासनाने ओबीसी जनगणना करण्यासंदर्भात कारवाई न केल्यास ओबीसी समाजातर्फे असहकार आंदोलन करण्याचा इशारा शरद वानखेडे यांनी दिला. आंदोलनानंतर डॉ. बबनराव तायवाडे, कवी प्रा. ज्ञानेश्वर वाकुडकर, शकील पटेल, अतुल लोंढे, निलेश कोढे, रोशन कुंभलकर, रोहित हरणे, अ‍ॅड. रेखा बाराहाते, कल्पना मानकर, वृंदा ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन सादर केले. आंदोलनात सहभागी मान्यवरांनी जोरदार नारेबाजी करून ओबीसी समाजाची जनगणना करण्याची मागणी रेटून धरली. यावेळी नंदा देशमुख, अनिता ठेंगरे, लक्ष्मी सावरकर, निलेश कोढे, रोशन कुंभलकर, अविनाश काकडे, रोहित हरणे, विनोद हजारे, राम वराडे, विशाल आसूटकर, गायत्री टेंबरे, चंद्रकांत हिंगे, प्रा. संजय पन्नासे, शकील पटेल, गणेश नाखले, पांडुरंग काकडे, अ‍ॅड. सूर्यकांत जयस्वाल, हेमंत गावंडे, पुरुषोत्तम शहाणे यांच्यासह ओबीसी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीagitationआंदोलन