शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील डेंग्यू प्रभावित जिल्ह्यात प्रयोगशाळा सुरू करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 20:32 IST

राज्यात डेंग्यू निदानासाठी ३८ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. त्यापैकी विदर्भात १० प्रयोगशाळा नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली येथे आहेत. ज्या भागात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येतील तेथे विशेष बाब म्हणून डेंग्यू निदान प्रयोगशाळा सुरू करण्यात येतील.

ठळक मुद्देविधानसभेत आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची माहिती

ऑनलाईन लोकमतनागपूर : राज्यात डेंग्यू निदानासाठी ३८ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. त्यापैकी विदर्भात १० प्रयोगशाळा नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली येथे आहेत. ज्या भागात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येतील तेथे विशेष बाब म्हणून डेंग्यू निदान प्रयोगशाळा सुरू करण्यात येतील. राज्यात नोव्हेंबर अखेर ३८,५७४ व्यक्तींना स्वाईन प्रतिबंधक लस देण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधानसभेत दिली.आमदार विजय वडेट्टीवार यांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना आरोग्य मंत्री डॉ. सावंत बोलत होते. ते म्हणाले की, राज्यात नोव्हेंबरअखेर डेंग्यूचे ६८९४ रुग्ण आढळून आले आहेत. विदर्भात आॅगस्ट ते आॅक्टोबर या काळात २३४ रुग्ण आढळले, मात्र डेंग्यूमुळे रुग्ण दगावल्याची नोंद नाही. विदर्भ हा कीटकजन्य आजारासाठी अतिसंवेदशील असल्याने या भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना गांभीर्याने राबविल्या जात आहेत.यावेळी झालेल्या चर्चेत एका उपप्रश्नाला उत्तर देताना आरोग्य मंत्री म्हणाले की, स्वाईन फ्लूच्या उपचारासाठी आॅसेल्टॅमीवीर हे औषध नागपूर येथील मेडिकल कॉलेज व अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून सर्व औषधी दुकानातून उपलब्ध करून देण्यात आले आहे.डेंग्यू, मलेरिया सारख्या कीटकजन्य आजारावर नियंत्रणासाठी कीटकजन्य सर्वेक्षण केले जात आहेत. स्वाईन फ्लू निदानासाठी विदर्भात दोन शासकीय व एक खासगी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर जिल्हे मलेरियासाठी संवेदनशील आहेत. त्यामुळे विदर्भातील ११ जिल्ह्यापैंकी नऊ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणी करण्यात येते.यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री डॉ. मिलिंद माने, अशोक पाटील, अमीन पटेल, यशोमती ठाकूर यांनी सहभाग घेतला.

 

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७dengueडेंग्यू