शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कुतूहल प्रदर्शनाला राष्ट्रीय स्तरावर नेणार : अजय संचेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 00:23 IST

वैद्यकीय क्षेत्रात नवनव्या तंत्रज्ञानाची भर पडत आहे. अद्ययावत उपकरणांमुळे तातडीने आजाराचे निदान होत आहे. उपचारात व शस्त्रक्रियेत त्याची मोलाची मदत मिळते. अशा उपकरणांविषयी प्रत्येक व्यक्तीला एक स्वाभाविक कुतूहल असते. सोबतच आपल्या शरीराची माहिती, आजार व त्यावरील उपचाराची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेले ‘कुतूहल’ हे आगळेवेगळे प्रदर्शन आहे. याची सुरुवात आज नागपुरातून झाली असली तरी त्याला राष्ट्रीय स्तरावर नेण्याचा आमचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही माजी खासदार अजय संचेती यांनी येथे दिली.

ठळक मुद्देनाविन्यपूर्ण व आगळेवेगळे प्रदर्शन पाहण्यासाठी उसळली गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वैद्यकीय क्षेत्रात नवनव्या तंत्रज्ञानाची भर पडत आहे. अद्ययावत उपकरणांमुळे तातडीने आजाराचे निदान होत आहे. उपचारात व शस्त्रक्रियेत त्याची मोलाची मदत मिळते. अशा उपकरणांविषयी प्रत्येक व्यक्तीला एक स्वाभाविक कुतूहल असते. सोबतच आपल्या शरीराची माहिती, आजार व त्यावरील उपचाराची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेले ‘कुतूहल’ हे आगळेवेगळे प्रदर्शन आहे. याची सुरुवात आज नागपुरातून झाली असली तरी त्याला राष्ट्रीय स्तरावर नेण्याचा आमचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही माजी खासदार अजय संचेती यांनी येथे दिली.विज्ञान भारती, इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट व विश्वेश्वरय्या राष्ट्रीय औद्योगिक संस्थानच्या (व्हीएनआयटी)वतीने तीन दिवसीय ‘कुतूहल’ या नाविन्यपूर्ण व आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाची उद्घाटन शनिवारी झाले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मंचावर महापौर नंदा जिचकार, डॉ. शंकर तत्त्ववादी, डॉ. नुकुल पाराशर, हृदय प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. के. आर. बालकृष्णन, आयएमए महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. वाय.एस. देशपांडे, आयएमए नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. आशिष दिसावल, कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटचे शैलेश जोगळेकर, अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय, प्रा. प्रशांत होले, शशिकांत चौधरी आदी उपस्थित होते.डॉ. देशपांडे म्हणाले, इंजिनीअरिंग आणि वैद्यकीय क्षेत्रामधील ‘कुतूहल’ या प्रदर्शनात अनुभवाला मिळणार आहे. हे अनोखे प्रदर्शन देशात पहिले असावे, असा दावाही त्यांनी केला. महापौर जिचकार यांनी या प्रदर्शनाला शुभेच्छा देत, या प्रदर्शनातून वैद्यकीय माहितीसोबतच या क्षेत्रातील तंत्रज्ञानाची माहिती मिळणार असल्याने प्रत्येकाने हे प्रदर्शन आवर्जून पाहण्याचे आवाहन केले. यावेळी जोगळेकर, डॉ. पाराशर, डॉ. तत्त्ववादी, डॉ. दिसावल यांनीही आपले विचार मांडले.प्रास्ताविक व्हीएनआयटीचे संचालक प्रा. प्रमोद पडोळे यांनी केले. संचालन प्रा. रश्मी उड्डनवाडीकर यांनी तर आभार डॉ. संजय वाके यांनी मानले.९ ते ११ फेब्रुवारीपर्यंत अभ्यंकरनगर गेट, व्हीएनआयटीच्या परिसरात आयोजित ‘कुतूहल’ प्रदर्शनात १५० वर स्टॉल्स व २५ विशिष्ट शाखा विभागांचा समावेश आहे. सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी नि:शुल्क खुले आहे. या प्रदर्शनात वैद्यकीय क्षेत्रात कामी येणाऱ्या रक्तदाब तपासण्याच्या यंत्रापासून ते सिटी स्कॅन उपकरणांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. याच्या सोबतीला शरीरातील विविध अवयवांची माहिती, त्याची रचना व कार्य, आजारांची माहिती आणि त्यावरील उपचाराच्या माहितीचे स्टॉल्स आहेत. शनिवारी पहिल्याच दिवशी विविध शाळा व नागरिकांनी गर्दी केली होती.नितीन गडकरी यांनी दिली भेटकेंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रदर्शनाला भेट देत प्रदर्शनाचे अवलोकनही केले. त्यांनी शासकीय दंत महाविद्यालय, ईएनटी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मोहन फाऊंडेशन, ‘एम्स’ आदींच्या स्टॉल्सला भेट देत उपस्थितांशी संवाद साधला. विशेष म्हणजे, विवेका हॉस्पिटलच्या स्टॉल्सने अँजिओप्लास्टीमध्ये वापरण्यात येणाऱ्या ‘स्टेंट’च्या कार्याची माहिती जाणून घेतली.

 

टॅग्स :Medicalवैद्यकीयtechnologyतंत्रज्ञान