शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कुणाल चचाणे अपहरण - हत्या प्रकरणातील आरोपींचा सात दिवसांचा पीसीआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 00:17 IST

कुणाल शालिकराम चचाणे (वय १७) नामक युवकाची हत्या करणारे अंबाझरीतील कुख्यात गुंड संतोष (वय ३२) आणि त्याचा भाऊ प्रशांत परतेकी (वय ३४) या दोघांना न्यायालयाने सात दिवसांचा पीसीआर मंजूर केला.

ठळक मुद्देनागपूर अंबाझरी पोलिसांकडून चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुणाल शालिकराम चचाणे (वय १७) नामक युवकाची हत्या करणारे अंबाझरीतील कुख्यात गुंड संतोष (वय ३२) आणि त्याचा भाऊ प्रशांत परतेकी (वय ३४) या दोघांना न्यायालयाने सात दिवसांचा पीसीआर मंजूर केला.कुणाल तेलंखेडीतील बालाजी सायकल स्टोअर्सजवळ राहत होता तर आरोपी परतेकी बंधू रामनगर तेलंखेडी परिसरातच राहतात. आरोपी संतोष आणिं त्याचा भाऊ प्रशांत या दोघांसोबत दोन दिवसांपूर्वी वाडीतील कुख्यात गुंड जेम्सचे कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात जेम्सकडून कुणाल सहभागी झाल्याने आरोपी संतोष आणि प्रशांतने कुणाल आणि जेम्सचा गेम करण्याचा कट रचला. त्यानुसार, मंगळवारी सकाळी १० वाजता कुणाल आणि त्याचा मित्र आकाश पाल फिरायला गेले असता मागावर असलेले संतोष आणि प्रशांतने कुणालला रस्त्यात गाठले. जुने भांडण विसरून जा, म्हणत आरोपींनी कुणाल तसेच आकाशला सीताबर्डी, भिवसेनखोरी गिट्टीखदान आणि वाडी परिसरात नेले. तिन्ही ठिकाणी आरोपी कुणालला मोठ्या प्रमाणात दारू पाजत असल्याचे पाहून आकाशला शंका आली. त्यामुळे तो वाडीतील कदम बारमधून पळून गेला. त्याने कुणालचा भाऊ विशाल शालिकराम चचाणे (वय २०) याला माहिती देऊन संतोष आणि प्रशांतने कुणालला सोबत नेल्याचे सांगितले. विशालने रात्री अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी रात्रभर शोधाशोध केली. मात्र, तो आढळला नाही. बुधवारी सकाळी संतोष आणि प्रशांत हाती लागताच अंबाझरीचे ठाणेदार भीमराव खंदाळे यांनी त्यांना जोरदार फटके हाणले. त्यानंतर त्यांनी कुणालची हत्या केल्याचे सांगून मृतदेह दाखवला. पोलिसांनी अपहरण आणि हत्येच्या आरोपाखाली संतोष तसेच प्रशांतला अटक केली. त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर करून त्यांचा १८ जुलैपर्यंत पीसीआर मिळवला.जेम्सचा शोध सुरूया हत्याकांडाला कारणीभूत असलेला वाडीतील जेम्स नामक कुख्यात गुंड फरार आहे. त्याच्याविरुद्ध हत्या तसेच अन्य गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो पोलिसांना वॉन्टेड असून, त्याचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Courtन्यायालयMurderखून