शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

मनपा विशेष समित्यांच्या सभापतिपदी कुकडे, दिवे, जाधव, झलके व मेश्राम यांची फेरनिवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 21:26 IST

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी १० विशेष समित्यांच्या सभापतींची निवड करण्यात आली. गेल्या वर्षभरातील चांगल्या रिपोर्ट कार्डचा विचार करता पाच विद्यमान सभापतींची फेरनिवड करण्यात आली आहे. यात परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे, शिक्षण सभापती दिलीप दिवे, करआकारणी व संकलन विशेष समितीचे सभापती संदीप जाधव, विधी समितीचे अ‍ॅड.धरमपाल मेश्राम व जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके आदींचा समावेश आहे.

ठळक मुद्देकुकरेजा यांच्यासह गिऱ्हे,चिखले, यादव, बालपांडे व गोटेकर यांना संधी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी १० विशेष समित्यांच्या सभापतींची निवड करण्यात आली. गेल्या वर्षभरातील चांगल्या रिपोर्ट कार्डचा विचार करता पाच विद्यमान सभापतींची फेरनिवड करण्यात आली आहे. यात परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे, शिक्षण सभापती दिलीप दिवे, करआकारणी व संकलन विशेष समितीचे सभापती संदीप जाधव, विधी समितीचे अ‍ॅड.धरमपाल मेश्राम व जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके आदींचा समावेश आहे.आरोग्य समितीच्या सभापतिपदाची जबाबदारी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. क्रीडा समिती सभापती म्हणून प्रमोद चिखले, गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी लक्ष्मी यादव, महिला व बालकल्याण सभापती संगीता गिऱ्हे, अग्निशमन व विद्युत समिती सभापती संजय बालपांडे तर स्थापत्य प्रकल्प विशेष समिती सभापती अभय गोटेकर यांची निवड करण्यात आली आहे.विशेष समितीत प्रत्येकी नऊ सदस्य आहे. सभागृहातील संख्याबळानुसार यात भाजपा सहा, काँग्रेस दोन तर बसपाच्या एका सदस्यांचा समावेश राहणार आहे. सभागृहात भाजपा सदस्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. परंतु काँग्रेस व बसपाकडून महापौरांना समित्यांसाठी सदस्यांची नावे न दिल्याने या पक्षांच्या सदस्यांची निवड पुढील सभागृहात केली जाणार आहे.परिवहन समिती : सभापती बंटी कुकडे, उपसभापती राजेश घोडपागे, सदस्य रूपा रॉय,विशाखा बांते ,रूपाली ठाकूर व नागेश मानकर.स्थापत्य प्रकल्प समिती : सभापती अभय गोटेकर,उपसभापती- किशोर वानखेडे,सदस्य विद्या मडावी,सोनाली कडू ,पल्लवी शामकुळे, ज्योती भिसीकर.वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती: सभापती वीरेंद्र कुकरेजा,उपसभापती लहुकुमार बेहते ,नागेश सहारे, लीला हाथीबेड, विशाखा बांते, सरिता कावरे.विधी व सामान्य प्रशासन समिती: सभापती धर्मपाल मेश्राम ,उपसभापती मीनाक्षी तेलगोटे,जयश्री वाडीभस्मे,शकुंतला पारवे, सुमेधा देशपांडे, मनिषा धावडे.शिक्षण समिती: सभापती दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने, रिता मुळे, स्वाती आखतकर, सुषमा चौधरी व प्रमिला मथरानी.गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी समिती: सभापती लक्ष्मी यादव,उपसभापती उषा पॅलट, भाग्यश्री कानतोडे, अनिल गेंडरे, ऋतिका मसराम व प्रमोद कौरती.क्रीडा समिती: सभापती प्रमोद चिखले, उपसभापती सुनील हिरणवार, सरला नायक, कांता रारोकर,नेहा वाघमारे व मनिषा कोठे.महिला व बालकल्याण समिती : सभापती संगीता गिऱ्हे, उपसभापती विशाखा मोहोड, दिव्या धुरडे, मंगला खेकरे, मनिषा अतकरे व नसीम बानो.जलप्रदाय समिती : सभापती विजय झलके,उपसभापती भगवान मेंढे, महेश महाजन, दीपक चौधरी, गोपीचंद कुमरे व जयश्री रारोकर.कर आकारणी व कर संकलन समिती : सभापती संदीप जाधव, उपसभापती सुनील अग्रवाल, महेंद्र धनविजय, रेखा साकोरे,शिल्पा धोटे,उज्ज्वला शर्मा.अग्निशमन व विद्युत विशेष समिती: सभापती संजय बालपांडे ,उपसभापती निशांत गांधी, वंदना भुरे ,वनिता दांडेकर ,संदीप गवई व भारती बुंडे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका