शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पुरुषांच्या मक्तेदारीच्या क्षेत्रात भरारी घेणाऱ्या महिलांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2023 20:03 IST

Nagpur News ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, लोकमत समूहाचे संस्थापक, संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य श्रद्धेय बाबूजी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त लोकमतने जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत आयोजित समारंभात या महिलांचा यथोचित गौरव करून त्यांच्या कार्याला सलाम केला.

ठळक मुद्दे श्रद्धेय बाबूजी जवाहरलाल दर्डा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजन

नागपूर : आॅटो, ई-रिक्षा, स्कूल व्हॅन, स्कूल बस, इतकेच काय तर मेट्रो आॅपरेटर अन् वृत्तपत्र विक्रेते, दूध विक्रेते या पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रांत उपराजधानीतील असंख्य महिलांनी उडी घेत भरारी घेऊन आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, लोकमत समूहाचे संस्थापक, संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य श्रद्धेय बाबूजी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त लोकमतने जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत आयोजित समारंभात या महिलांचा यथोचित गौरव करून त्यांच्या कार्याला सलाम केला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लोकमतचे संचालक (परिचालन) अशोक जैन, लोकमतचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र, लोकमत टाइम्सचे संपादक एन. के. नायक उपस्थित होते. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी सत्कारमूर्ती महिलांचा रोपटे आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला. यावेळी बोलताना लोकमतचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने यांनी समाजातील विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्ती, शोषित-पीडित वर्गाला जोडून, त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होऊन लोकमत परिवार वाढविणे ही श्रद्धेय बाबूजींची संकल्पना होती, असे सांगितले. संचालन लोकमत सखी मंचच्या सहायक व्यवस्थापक नेहा जोशी यांनी केले. सन्मान सोहळ्याला सत्कारमूर्ती महिलांसोबत त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कर्तृत्ववान महिलांचा झाला गौरव समारंभात मेट्रोच्या ज्युनिअर इंजिनिअर पारुल सारडा, नागकन्या विजय, मेट्रो ट्रेन आॅपरेटर शुभांगी ढोके, वृत्तपत्र विक्रेत्या वृषाली नीरज कडू, विशाखा नारायणे, पेपर स्टॉल चालक लीना भुते, स्कूल व्हॅनचालक भारती अग्रवाल, रेणुका दहिवाले, स्कूल बसचालक नलिनी फुलझेले, आॅटोचालक आशा सोमकुवर, अर्चना बोरकर, प्रतिमा बागडे, नीतू सुरजुसे, कल्याणी सोनुले, ई-रिक्षा चालक अंतकला गोहणे, रोशनी बोकडे, लक्ष्मी गोन्नाडे आणि गेल्या ४६ वर्षांपासून सायकलवर फिरून दूध वितरण करणाऱ्या गौरी प्रपंचे यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंट