शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णा इंगळे हे कर्मचाऱ्यांसाठी झटणारे समर्पित नेतृत्व

By admin | Updated: November 9, 2014 00:47 IST

शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुखदु:खात सामील असलेले, त्यांच्या समस्या शासनदरबारी प्रभावीपणे मांडणारे आणि त्या सोडविण्यासाठी समर्पितपणे झटणारे नेते म्हणजे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे

अभीष्टचिंतन सोहळा : वक्त्यांचे गौरवोद्गार नागपूर : शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुखदु:खात सामील असलेले, त्यांच्या समस्या शासनदरबारी प्रभावीपणे मांडणारे आणि त्या सोडविण्यासाठी समर्पितपणे झटणारे नेते म्हणजे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे होत. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी त्यांचा अभीष्टचिंतन सोहळा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कास्ट्राईब कार्यालयासमोर आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी उपरोक्त शब्दांत त्यांचा गौरव केला. अध्यक्षस्थानी तहसीलदार धर्मेश फुसाटे होते. आॅफिसर्स फोरमचे पदाधिकारी शिवदास वासे, माहिती संचालक मोहन राठोड, समाज कल्याण अधिकारी सिद्धार्थ गायकवाड, माजी उपजिल्हाधिकारी रामभाऊ आंबुलकर, माजी शिक्षणाधिकारी निर्गुनश: ठमके प्रमुख अतिथी होते. याप्रसंगी बोलताना धर्मेश फुसाटे म्हणाले कृष्णा इंगळे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे. शासनदरबारी त्यांचा दबदबा आहे. कर्मचाऱ्यांच्या विरोधात असलेले अनेक जी.आर. त्यांनी बदलवून आणले. १९८० च्या काळात कास्ट्राईबकडे बेरोजगारंचे नाव नोंदणीचे काम देण्यात आले होते. त्यात मी सुद्धा नाव नोंदणी केली. तेव्हा नागपुरातून किमात ५ ते ६ हजार बेरोजगारांनी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी अडीच हजार लोकांना नोकरी लागल्याची आठवणसुद्धा त्यांनी यावेळी सांगितली. शिवदास वासे म्हणाले, कुठलीही संघटना बांधणे अतिशय कठीण आहे. कृष्णा इंगळे यांनी कर्मचाऱ्यांची संघटना अतिशय शिस्तबद्धपणे बांधली आहे. इतकेच नव्हे तर या संघटनेची शासनदरबारी दखल घेतली जाते इतकी ती सक्षम आहे. येणारा काळ हा अतिशय कठीण असून ही संघटना आणखी मजबूत व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मोहन राठोड म्हणाले, इंगळे यांना प्रत्येक कर्मचाऱ्याच्या समस्यांची जाणीव आहे. शासकीय जी.आर. तर त्यांना तोंडपाठ आहेत. कर्मचाऱ्यांची कामे ते समर्पितपणे करतात, हा त्यांच्यातील मुख्य गुण आहे. सिद्धार्थ गायकवाड, निर्गुनश: ठमके यांनीही इंगळे यांच्या कार्याचा गौरव केला. याप्रसंगी शाल, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले सात ग्रंथ भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विदर्भातील विविध जिल्ह्यातून आलेल्या संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांचे स्वागत केले. केरळचे माजी राज्यपाल रा.सू. गवई यांनीसुद्धा आपल्या प्रतिनिधी मार्फत पुष्पगुच्छ पाठवून स्वागत केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जवखेडा हत्याकांडातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच आरोपीला तातडीने अटक करण्यात यावी, या मागणीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. संचालन सोहन चवरे यांनी केले. बाळासाहेब बनसोड यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. (प्रतिनिधी)शासकीय कार्यालयांमध्ये अदृश्य जातीभेद जातीभेद हा दोन प्रकारचा असतो. एक दृश्य आणि एक अदृश्य. शासकीय कार्यालयात काम करीत असताना अदृश्य स्वरूपाचा जातीभेद पाळला जातो, अशी खंत कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली. चळवळीचे बाळकडू आपल्याला घरातूनच मिळाले. ४० वर्षापासून आपण चळवळीत आहो. कास्ट्राईब संघटनेच्या माध्यमातून अनेक कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला. काही कटू अनुभव सुद्धा आलेत. परंतु त्याची फिकीर नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा आणि आपले जन्मगाव आणि समाजासाठी काम करा, असे आवाहनसुद्धा त्यांनी यावेळी केले. कर्मचाऱ्यांचाही प्रतिनिधी विधान परिषदेवर पाठवा शिक्षक, पदवीधर या धर्तीवर कर्मचाऱ्यांचा प्रतिनिधी सुद्धा विधान परिषदेत पाठविण्यात यावा. गेल्या ४० वर्षांपासून कर्मचाऱ्यांसाठी झटत असलेले कृष्णा इंगळे हे यासाठी अगदी योग्य आहेत, तेव्हा त्यांनाच कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून विधान परिषदेवर पाठविण्यात यावे, अशी मागणी यावेळी सर्वानुमते करण्यात आली.