शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील कोविड हेल्थ सेंटरला डॉक्टर मिळेनात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 11:31 IST

प्रशासनाने भरतीची प्रक्रिया सुरू केली मात्र डॉक्टर व परिचारिका मिळत नसल्याने मनपा प्रशासन हतबल झाले आहे. डॉक्टर व प्रशिक्षित कर्मचारी न मिळाल्यास नागपुरातील सेंटर कसे सुरू करणार, अशी गंभीर समस्या उभी ठाकली आहे.

ठळक मुद्दे मनपा प्रशासन हतबल पाच सज्ज रुग्णालयात प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुलै महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढणार असल्याचे गृहीत धरून महापालिका प्रशासनाने पाच रुग्णालये अत्याधुनिक केली. ४५० खाटांसह आयसीयू सुविधा उपलब्ध आहे. यातील इंदिरा गांधी रुग्णालय, पाचपावली सूतिकागृह व आयसोलेशन येथे एकूण २७२ खाटांचे डेडिकेटेड हेल्थ सेंटर सज्ज केले. यासाठी डॉक्टरांसह ५०० परिचारिका व प्रशिक्षक कर्मचाऱ्यांची गरज आहे. प्रशासनाने भरतीची प्रक्रिया सुरू केली मात्र डॉक्टर व परिचारिका मिळत नसल्याने मनपा प्रशासन हतबल झाले आहे. डॉक्टर व प्रशिक्षित कर्मचारी न मिळाल्यास सेंटर कसे सुरू करणार, अशी गंभीर समस्या उभी ठाकली आहे.१०.५० कोटींचा खर्चपाच रुग्णालयांच्या अपग्रेडेशनवर सुमारे १०.५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यावर ७ कोटी खर्च करण्यात आले आहेत. गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालय व पाचपावली सूतिकागृह येथे प्रत्येकी १३० बेडसह अतिदक्षता विभाग, व्हेंटिलेटरसह सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच इमामवाडा येथील आयसोलेशन रुग्णालय, काटोल रोड येथील के.टी.नगर रुग्णालय व सदर येथील आयुष रुग्णालय सज्ज केली आहेत.मेयो, मेडिकलचा भार कमी कसा होणार?कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोविड-१९ साथीचा उद्रेक बघता केंद्राच्या आदेशाप्रमाणे, गरज भासल्यास कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी मनपाची रुग्णालये सज्ज करण्यात आली. परंतु डॉक्टर व परिचारिका नसल्याने उपचार करणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत मेयो, मेडिकलवरील रुग्णांचा भार कमी कसा करणार, असा प्रश्­न कायम आहे.हॉटेलमध्ये अडीच हजार शुल्कशहरातील आठ हॉटेल कोविड केअर सेंटरमध्ये परिवर्तित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या हॉटेलमध्ये कोरोनाची लक्षणे नसलेले पॉझिटिव्ह रुग्ण राहू शकतील; मात्र यासाठी रुग्णांना दररोज अडीच हजार रुपये शुल्क द्यावे लागेल.मनपा कर्मचाऱ्यांचीच उपचारासाठी भटकंतीमहापालिकेच्या अग्निशमन विभागातील १४ कर्मचारी व अधिकारी पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांना उपचारासाठी भटकंती करावी लागली. मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची अशी अवस्था असेल तर सामान्य नागरिकांचे काय? असा प्रश्न उभा ठाकला आहे. होम क्वारंटाईन असलेल्यांनाही उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस