शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मनोरुग्णालय की कोंडवाडा?

By admin | Updated: December 14, 2015 02:51 IST

गेल्या १० वर्षांतील सरकारी अनास्थेच्या मेंटल ब्लॉकमुळे नागपूरच्या शासकीय प्रादेशिक मनोरुग्णालयाची अवस्था कोंडवाड्यासारखी झाली आहे.

बरे झालेल्या १४० रुग्णांचे पुनर्वसन केव्हा? : डॉक्टरांची रिक्त पदे व सोयींचा अभावसुमेध वाघमारे ल्ल नागपूरगेल्या १० वर्षांतील सरकारी अनास्थेच्या मेंटल ब्लॉकमुळे नागपूरच्या शासकीय प्रादेशिक मनोरुग्णालयाची अवस्था कोंडवाड्यासारखी झाली आहे. तुरुं गातील कैद्यांपेक्षाही इथल्या रुग्णांची अवस्था दयनीय आहे. लालफितीची मनमानी, अपुरा निधी, औषधांचा तुटवडा, डॉक्टरांची कमतरता, पर्यायी उपचारांची वानवा अशा त्रुटींमुळे इथल्या कारभाराचा बोजवारा उडाला आहे. दुसरीकडे १४० रुग्ण बरे होऊन कुणाला १० तर कुणाला ५० वर्षे झाली आहेत. मात्र नातेवाईकांनी त्यांच्याकडे पाठ फिरविल्याने त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. मनोरुग्णांवर योग्य औषधोपचार करून त्यांना सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगता यावे यासाठी इंग्रजांनी महाराष्ट्रात चार मनोरुग्णालयांची स्थापना केली. मात्र, सरकारी अनास्थेमुळे रुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे. दररोजच्या ताणतणावांमुळे मनोरुग्णांची संख्या वाढत आहे. असे असताना आजही जुन्याच पद्धतीचे उपचार व औषधांचा वापर सुरू आहे. वेड्यांकडे काय लक्ष द्यायचे, अशा भावनेतूनच या खात्याचे काम सुरू असल्याचे चित्र आहे. मनोरुग्णालयाचा पुनर्वसन कार्यक्रम ठप्परुग्णालयात बरे झालेल्या रुग्णांची संख्या १४० वर आहे. या मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी २०१०-२०११ मध्ये पुनर्वसन कार्यक्रम सुरू करण्यात आला. सुतारकाम, हस्तकला, बागकाम, आॅईल पेंटिंग, लॅमिनेशन, झेरॉक्स, स्क्र ीन प्रिंटिंग, रोटा प्रिंटिंग, वेल्डिंग, मेणबत्ती बनवणे, औषधांची पाकिटे तयार करण्याचे प्रशिक्षण ‘राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन’च्या अनुदानातून चालविले जात होते. परंतु २०१४ मध्ये ही योजनाच बंद पडल्याने अनुदानाशिवाय ही पुनर्वसन योजनाही बंद पडली आहे. अपुरा निधीचा फटका रुग्णांनामनोरुग्णालयाला वर्षाकाठी पाच लाख रुपयांचा निधी मिळतो. यातून रुग्णांना आवश्यक असलेली औषधे उपलब्धे करून दिली जातात. मेयो, मेडिकलमध्ये उपचारासाठी आलेल्या मनोरुग्णांच्या विविध तपासण्यांचा खर्चही यातून भागविला जातो. याशिवाय रुग्णांच्या मनोरंजनासाठी आयोजित करण्यात येणारे विविध उपक्रम व क्रीडा महोत्सवाच्या खर्चाचा भारही याच निधीवर पडतो. परिणामी एखाद्या रुग्णाला बाहेरून औषध देण्याची गरज पडल्यास निधीच्या तुटवड्यामुळे रुग्ण अडचणीत येतो. जून-२०१४ या महिन्यात आवश्यक औषधे उपलब्ध न झाल्याने चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अटेंडंटची संख्या अत्यल्पनागपूर : नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात २०१० मध्ये ४१ हजार ८२८ रुग्णांची नोंद झाली होती, २०१३ मध्ये यात ११ हजार १७८ रुग्णांची वाढ होऊन रुग्णसंख्या ५३ हजारावर गेली आहे, तर २०१४ मध्ये ही संख्या ५० हजारावर आहे. यात पुरुषांची संख्या अधिक असून स्क्र ीझोफेनिया (नैराश्य) आणि डिप्रेशनच्या (खिन्नता) रु ग्णांची संख्या सर्वाधिक आहे. सध्या मनोरुग्णालयात ५७० स्त्री व पुरुष रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, डॉक्टरांपासून ते अटेंडंट यांची संख्या तोकडी असल्याने उपचारावर परिणाम होत आहे. रुग्णालयात मनोविकार तज्ज्ञांची नऊ पदे मंजूर आहेत. यातील चार पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. मनोरुग्णांची देखरेख व देखभाल करण्याचे सर्वात महत्त्वाचे कार्य अटेंडंटचे आहे. परंतु मनोरुग्णालयात १८२ पुरुष अटेंडंटची पदे मंजूर असताना मागील पाच वर्षांपासून २० पदे रिक्त आहेत. (प्रतिनिधी)