शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

मुंबईतील कोळीवाडे, गावठाणे, गृहनिर्माण सोसायट्या, देवस्थानच्या जमिनी भोगवटादार वर्ग एक करणार- चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 23:12 IST

मुंबईतील कोळीवाडे, गावठाणे यांच्यासह सरकारने लीज वर दिलेल्या जागेवरील गृहनिर्माण सोसायट्या, इमान जमिनी आणि देवस्थाने भोगवटादार वर्ग एक करण्यात येईल, अशी घोषणा आज विधानसभेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

नागपूर- मुंबईतील कोळीवाडे, गावठाणे यांच्यासह सरकारने लीज वर दिलेल्या जागेवरील गृहनिर्माण सोसायट्या, इमान जमिनी आणि देवस्थाने भोगवटादार वर्ग एक करण्यात येईल, अशी घोषणा आज विधानसभेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्र. ४० झ्र महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) महाराष्ट्र जमीन महसूल (विवक्षित भूमिधारींचा भोगवटदार - वर्ग एक मध्ये अंतर्भाव करण्यासाठी परवानगी देण्याबाबत) नियम (निरसन) विधेयक, २०१८ आज विधानसभेत मंजूर करण्यात आले.या विधेयकावर बोलताना मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी मुंबईतील महसूल जमिनीच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले. भूमिधारी माणसाला भूमिस्वामी बनविण्याचे सरकारचे चांगले उद्दिष्ट असले तरी सरकारी बाबू हा चांगला हेतू साध्य होत देऊ देत नाहीत ते या मालमत्तांचे रक्षणकर्ते आहेत मात्र वास्तवात हे अधिकारी मालक असल्या सारखे वागतात, आणि खरा मालक असलेला शेतकरी त्याच्या हक्कांपासून वंचित राहतो. हा कायदा मंजूर झाल्यानंतर, त्याची सुटसुटीत नियमावली तयार करून अधिकाऱ्यांना टार्गेट देऊन जास्तीत जास्त शेतक-यांना जमिनी दिल्या जातील यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे सांगत वर्ग दोन मधील जमिनी वर्ग एक करण्याच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले.तर मुंबईतील कोळीवाडे, गावठाणे यांच्यासह सरकारने लीजवर दिलेल्या जागेवरील गृहनिर्माण सोसायट्या, इमान जमिनी आणि देवस्थाने भोगवटदार वर्ग दोन मध्ये असल्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीची परवानगी घ्यावी लागते, त्यांच्या एकूण विकासाला मर्यादा आल्या आहेत. मुंबईतील ३६ कोळीवाडे हे सरकारच्या जमिनीवर आहेत, हे मूळ रहिवाशी असूनही विकासापासून वंचित आहेत, त्यामुळे या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय आजच्या आज जाहीर करावा, अशी आग्रही मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली. ती मान्य करत याबाबतची घोषणा महसूल मंत्र्यांनी केली, मात्र या वर्ग करीत असताना त्यांच्याकडून घ्यायच्या रक्कमेबाबत अधिका-यांची समितीने ज्या शिफारसी केल्या आहेत, त्यानुसार या रक्कमा मोठ्या आहेत त्यामुळे याबाबत रहिवाशांना दिलासा द्यायचा झाल्यास कॅबीनेटमध्ये जाऊन निर्णय घ्यावा लागेल तो देखील लवकरच घेण्यात येईल असे मंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटील