शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात रुग्णाच्या मृत्यूला घेऊन डॉक्टरवर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 22:58 IST

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) वॉर्ड क्रमांक ७ मध्ये भरती असलेल्या एका बालिकेचा मृत्यू झाल्याने तिच्या मामाने डॉक्टरवर चाकूहल्ला केला. परंतु त्याचवेळी तैनात असलेल्या महाराष्ट्र  सुरक्षा बलाच्या (एमएसएफ) दोन सुरक्षा रक्षकाने हल्लेखोराला पकडल्याने पुढील अनर्थ टळला. हल्लेखोराने सुरक्षा रक्षकावरही चाकूहल्ला केला. याच दरम्यान भरती रुग्णांच्या नातेवाईकांनी हल्लेखोराला पकडून चांगलाच चोप दिला. या घटनेने मात्र रुग्णालयात खळबळ उडाली.

ठळक मुद्देदोन सुरक्षा रक्षक जखमी : रुग्णांच्या नातेवाईकांनी पकडून हल्लेखोराला बदडले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) वॉर्ड क्रमांक ७ मध्ये भरती असलेल्या एका बालिकेचा मृत्यू झाल्याने तिच्या मामाने डॉक्टरवर चाकूहल्ला केला. परंतु त्याचवेळी तैनात असलेल्या महाराष्ट्र  सुरक्षा बलाच्या (एमएसएफ) दोन सुरक्षा रक्षकाने हल्लेखोराला पकडल्याने पुढील अनर्थ टळला. हल्लेखोराने सुरक्षा रक्षकावरही चाकूहल्ला केला. याच दरम्यान भरती रुग्णांच्या नातेवाईकांनी हल्लेखोराला पकडून चांगलाच चोप दिला. या घटनेने मात्र रुग्णालयात खळबळ उडाली.मिळालेल्या माहितीनुसार, ‘अ‍ॅक्यूड फ्लेसिड पॅरालिसिस’ झालेल्या अलिना खान (६) हिला शुक्रवारी मेयोच्या बालरोग विभागाच्या वॉर्ड क्र. ७ मध्ये भरती करण्यात आले होते. सोमवारी तिची प्रकृती अचानक गंभीर झाली. अलिनाला वॉर्डातच असलेल्या पिडियाट्रिक इन्टेसिव्ह केअर युनिटमध्ये (पीआयसीयू) दाखल केले. डॉक्टर मुलीला वाचविण्यासाठी सर्वाेतोपरी प्रयत्न करीत होते. याचदरम्यान मुलीची आई व नातेवाईक ‘पीआयसीयू’च्या बाहेर काचेतून हे सर्व पाहत होते. मुलीचा मृत्यू झाल्याचे दिसताच तिच्या आईचा संताप अनावर झाला. तिने ‘पीआयसीयू’ ची काच फोडली. फुटलेली काच हातात पकडून ‘पीआयसीयू’मध्ये आली. तिथे ठेवलेल्या एका व्हेंटिलेटरला खाली पाडून, हातातील काच फेकून मुलीला जवळ केले. याच दरम्यान मृत बालिकेचा मामा सलीम एजाज (२९) रा. ताजबाग हा चाकू घेऊन वॉर्डात शिरला. त्यावेळी उपस्थित डॉक्टरवर अचानक चाकू उगारला. यावेळी वॉर्डाच्या प्रवेशद्वारावर तैनात असलेले सुरक्षा रक्षक प्रभूदास राठोडने प्रसंगावधान राखून त्याला पकडले, परंतु हल्लेखोराने त्याच्या डोळ्यावर चाकू मारला. रुग्णाच्या नातेवाईकांच्या आरडा-ओरडमुळे बाहेर तैनात असलेला दुसरा सुरक्षा रक्षक सुधाकर सपाठे धावून आला, परंतु हल्लेखाराने त्याच्या हातावर चाकूने हल्ला करून जखमी केले. वॉर्डात भरती असलेले रुग्णांचे नातेवाईक भयभीत झाले, परंतु त्यांनी एकजूट करीत हल्लेखोराला पकडले व चांगलाच चोप दिला. अर्ध्या तास चालेल्या या घटनेने रुग्णालयात भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेची माहिती मिळताच अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संध्या मांजरेकर, एमएसएफचे सहसंचालक जगदेव आखले यांनी घटनास्थळाला भेट दिली. सुरक्षा रक्षकांनी हल्लेखोराला तहसील पोलिसांच्या हवाली केले.

टॅग्स :doctorडॉक्टरnagpurनागपूर