वाडी : नगर परिषद वाडी अंतर्गत गजानन सोसायटीला लागून असलेल्या मंगलधाम सोसायटी वाॅर्ड नं.१० येथील सैनिक चौक जवळील नाला ते उमक आटा चक्की हा परिसर वर्दळीचा आहे. पावसाळ्यात येथे रस्त्यावर साधारणतः ३ फूट पाणी साचून राहत असल्याने स्थानिकांना विशेषतः महिला व वृध्दांना मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागते. शाळेत जाताना विद्यार्थ्यांना बूट हातात घेऊन रस्ता पार करावा लागतो. सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्याची योग्यपणे सफाई न केल्यामुळे वेळीप्रसंगी नागरीकांच्या घरात पाणी शिरते. रस्त्यावर पाणी साचत असल्यामुळे पाण्यावर डासांची पैदास होऊन स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरात डेंगू सारख्या आजाराची लागण झाली आहे. वरील समस्या तातडीने सोडविण्यासाठी माजी पंचायत समिती सभापती प्रमिला पवार यांच्या नेतृत्वात विजया तलमले, संगीता सावरकर, वनिता बिडवाईक, संगीता कुकडकर, माया चटप आदींनी मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले याना निवेदन दिले.
270721\img_20210727_135739.jpg
फोटो