शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

किशोरदांची डायरी, मधाळ गाणी अन् मिलिंद इंगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 22:47 IST

आयुष्यातील घटना, प्रसंगांना ऐकण्याची उत्सुकता प्रेक्षकांना नेहमीच असते. ही संधी प्रसिद्ध गायक मिलिंद इंगळे यांनी नागपूरकरांना उपलब्ध करून दिली अन् ‘आज मुझे कुछ कहना हैं’ या संपूर्ण संहिताबद्ध कार्यक्रमाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

ठळक मुद्देलाईव्ह शो : संपूर्ण संहिताबद्ध कार्यक्रमाने नागपूरकर मंत्रमुग्ध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हरहुन्नरी अभिनेता, गीतकार, संगीतकार, निर्माता, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि अतरंगी गायक अशा अनेक भूमिका एकाचवेळी जगणारा औलिया म्हणजे किशोर कुमार. अगदी दंतकथा ठरावी असे त्याचे आयुष्य. म्हणूनच त्याच्या आयुष्यातील घटना, प्रसंगांना ऐकण्याची उत्सुकता प्रेक्षकांना नेहमीच असते. ही संधी प्रसिद्ध गायक मिलिंद इंगळे यांनी नागपूरकरांना उपलब्ध करून दिली अन् ‘आज मुझे कुछ कहना हैं’ या संपूर्ण संहिताबद्ध कार्यक्रमाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. इनरव्हाईस प्रोडक्शनतर्फे शनिवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सादर झालेल्या या अभिनव कार्यक्रमात किशोरदांची काल्पनिक डायरी, त्यांनी गायलेली मधाळ गाणी अन् त्या गाण्यांना मिलिंद इंगळेंच्या आवाजाचा साज अशी ही जुगलबंदी मस्त रंगली. ‘आज मुझे कुछ कहना हैं’ या गीताने मिलिंद यांनी कार्यक्रमाचा प्रारंभ केला. यानंतर लगेच ‘एक लडकी भिगी भागीसी...’ हे उडत्या चालीतील किशोरदांचे गाणे त्यांनी खास त्यांच्या स्टाईलमध्येच सादर केले. ‘ख्वाब हो तुम या कोई हकिकत...’,‘नखरेवाली...’ ‘इना मिना डिका...’ ‘रूप तेरा मस्ताना...’या गाण्यांनी माहोल केला. संथचालीतील ‘चिंगारी कोई भडके...’‘कहेना हैं...’ या गाण्यांनाही श्रोत्यांची खास दाद मिळाली. आरजे दिलीप यांनी किशोरदांच्या काल्पनिक डायरीतून त्यांच्या आयुष्यातील अनेक अस्पर्शित पैलू उलगडून दाखवले. मिलिंद इंगळेंना आॅक्टोपॅडवर महेंद्र वातूलकर, तबला-प्रशांत नागमोते, कि-बोर्ड- परिमल जोशी, लिड गिटार-गौरव टाकसाळे तर बेस गिटारवर रॉबिन व्हिलियम्स यांनी सुरेल सहसंगत केली.

टॅग्स :kishor kumarकिशोर कुमारcultureसांस्कृतिक