किरण सरनाईक यांच्या निवडणुकीला आव्हान : हायकोर्टात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 11:12 PM2021-01-07T23:12:26+5:302021-01-07T23:14:07+5:30

Kiran Sarnaik election challenge विधान परिषदेच्या अमरावती शिक्षक मतदारसंघातून विजयी झालेले अपक्ष उमेदवार ॲड. किरण सरनाईक यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात निवडणूक याचिका दाखल करण्यात आली आहे. त्या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे.

Kiran Sarnaik's election challenge: Petition in High Court | किरण सरनाईक यांच्या निवडणुकीला आव्हान : हायकोर्टात याचिका

किरण सरनाईक यांच्या निवडणुकीला आव्हान : हायकोर्टात याचिका

googlenewsNext

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : विधान परिषदेच्या अमरावती शिक्षक मतदारसंघातून विजयी झालेले अपक्ष उमेदवार ॲड. किरण सरनाईक यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात निवडणूक याचिका दाखल करण्यात आली आहे. त्या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे.

शेखर भोयर यांनी सरनाईक यांच्या निवडणुकीला आव्हान दिले आहे. सरनाईक यांनी निवडणूक प्रचारादरम्यान मतदारांना आकर्षित करण्यासाठी साड्या व इतर भेटवस्तू वितरित केल्या. लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार ही कृती भ्रष्ट व्यवहारामध्ये मोडते. त्यामुळे सरनाईक यांची निवड अवैध ठरवून या मतदारसंघात नव्याने निवडणूक घेण्यात यावी असे भोयर यांचे म्हणणे आहे. सरनाईक यांनी १५ हजार ६०६ मते मिळवून निकटचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. श्रीकांत देशपांडे यांचा पराभव केला आहे. भोयर यांच्यावतीने अ‍ॅड. शेखर ढेंगाळे कामकाज पाहतील.

Web Title: Kiran Sarnaik's election challenge: Petition in High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.