लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर (खात) : पहिल्या पत्नीने मुलासाठी पतीला त्याच्या मालकीच्या शेताचा हिस्सा मागितला. त्यामुळे संतप्त झालेल्या पतीने शांत डोक्याने पत्नीसह तरुण मुलाला शेतात नेले आणि दोघांचीही हत्या करून त्यांचे मृतदेह शेतात एकाच खड्ड्यात पुरले. दोघांचीही हत्या दगडाने ठेचून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. शिवाय, आरोपी पतीने समर्पण करून गुन्हा कबूल करीत घटनेची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली. ही घटना अरोली (ता. मौदा) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खात नजीकच्या घोटमुंढरी शिवारात मंगळवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.लता अनिरुद्ध बावणे (३८) व धीरज अनिरुद्ध बावणे (१८) अशी मृत आई व मुलाची नावे असून, अनिरुद्ध बावणे, सर्व रा. घोटमुंढरी, ता. मौदा असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. लता व अनिरुद्ध एकाच गावचे असून, त्यांनी १९ वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला. धीरजच्या जन्मानंतर त्या दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि दोघेही वेगवेगळे राहू लागले. दरम्यान, अनिरुद्धने दुसरा विवाह केला. त्यामुळे लता तिचा मुलगा, आई व वडिलांसह काटोलला राहायला गेली. याच काळात त्यांचा वाद न्यायालयात पोहोचला. अनिरुद्ध तिला पोटगीही द्यायचा.दोन वर्षांपूर्वी या पती - पत्नीमध्ये समेट झाला आणि दोघेही नागपूरला राहू लागले. धीरजही त्यांच्यासोबत होता. लताला तिच्या मुलासाठी अनिरुद्धच्या संपत्तीतील हिस्सा हवा होता. त्यामुळे तिने अनिरुद्धकडे शेतीसाठी तगादा लावला होता. अनिरुद्ध आधीच नागपूरहून घोटमुंढरीला पोहोचला. त्यानंतर लता व धीरज मंगळवारी (दि. २७) घोटमुंढरीला गेले.
पत्नीसह मुलाची हत्या : नागपूर जिल्ह्यातील घोटमुंढरी येथील थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 20:07 IST
पहिल्या पत्नीने मुलासाठी पतीला त्याच्या मालकीच्या शेताचा हिस्सा मागितला. त्यामुळे संतप्त झालेल्या पतीने शांत डोक्याने पत्नीसह तरुण मुलाला शेतात नेले आणि दोघांचीही हत्या करून त्यांचे मृतदेह शेतात एकाच खड्ड्यात पुरले. दोघांचीही हत्या दगडाने ठेचून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. शिवाय, आरोपी पतीने समर्पण करून गुन्हा कबूल करीत घटनेची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली. ही घटना अरोली (ता. मौदा) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खात नजीकच्या घोटमुंढरी शिवारात मंगळवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
पत्नीसह मुलाची हत्या : नागपूर जिल्ह्यातील घोटमुंढरी येथील थरार
ठळक मुद्देहत्येनंतर दोन्ही मृतदेह शेतात पुरले : शेतीच्या वाटणीवरून होता वाद