शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात हत्यांचे सत्र सुरूच; जुन्या वादातून कामगाराचा घेतला जीव

By योगेश पांडे | Updated: July 6, 2023 17:56 IST

Nagpur News उपराजधानीतील अधिकाऱ्यांकडून गुन्हे नियंत्रणात असल्याचा दावा करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात हत्यांचे सत्र सुरूच आहे. जुन्या वादातून एका आरोपीने एका टाईल्स फिटिंगचे काम करणाऱ्या तरुणाचा जीव घेतला.

योगेश पांडेनागपूर : उपराजधानीतील अधिकाऱ्यांकडून गुन्हे नियंत्रणात असल्याचा दावा करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात हत्यांचे सत्र सुरूच आहे. जुन्या वादातून एका आरोपीने एका टाईल्स फिटिंगचे काम करणाऱ्या तरुणाचा जीव घेतला. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

भारत गुलाब उके (४०, पाहुणे ले आऊट, पिवळी नदी) असे मृतकाचे नाव असून रुपेश उर्फ बंटी यशवंत गडकरी (२८, मांडवा वसती) हा आरोपी आहे. बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास भारत विश्वदीप बौद्धविहाराजवळील एका बाकड्यावर बसला होता. त्याच्यासोबत दीपक मेश्राम व सुखदेव सहारे हे मित्र होते. अचानक तेथे बंटी आला व जुन्या वादाच्या रागातून त्याने भारतच्या पाठीवर व मानेवर वार करून त्याला गंभीर जखमी केले. भारत रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर बंटी तेथून फरार झाला. परिसरातील लोकांनी भारतच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली. भारतला ऑटोतून मेयो इस्पितळात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. भारतचा आतेभाऊ अलंकार मासुरकर याने पोलिसांना या हत्येची माहिती दिली. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी बंटीविरोधात गुन्हा नोंदविला. बंटीला काही तासांतच अटकदेखील करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी