शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  धकातेची हत्या दहशत निर्माण करण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 20:41 IST

गुन्हेगारांमधील आपसी वर्चस्वाच्या लढाईतूनच गोळीबार चौकाजवळ रविवारी रात्री अंकित धकातेची हत्या करण्यात आली. गुन्हेगारांच्या दोन टोळळ्यांमधील वर्चस्वाची लढाई या हत्येमागे आहे. त्याची हत्या करून आपल्या टोळीची दहशत निर्माण करण्यासाठी आरोपींनी अत्यंत क्रूरपणे धकातेची हत्या केल्याची माहिती पुढे आली आहे.

ठळक मुद्देगुन्हेगारांमधील वर्चस्वाची लढाई : दोघांना अटक, तीन फरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हेगारांमधील आपसी वर्चस्वाच्या लढाईतूनच गोळीबार चौकाजवळ रविवारी रात्री अंकित धकातेची हत्या करण्यात आली. गुन्हेगारांच्या दोन टोळळ्यांमधील वर्चस्वाची लढाई या हत्येमागे आहे. त्याची हत्या करून आपल्या टोळीची दहशत निर्माण करण्यासाठी आरोपींनी अत्यंत क्रूरपणे धकातेची हत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. तहसील पोलिसांनी हत्येचा सूत्रधार रोशन चिंचघरे आणि त्याचा साथीदार नितीन उर्फ मच्छी धकाते या दोघांना अटक केली. तर, गुन्ह्यांतील तीन आरोपी अद्याप फरार आहेत.अंकित रामू धकाते (रा. पाचपावली) हा जुना गुन्हेगार असून, तो सध्या मटका अड्डा चालवायचा. वर्चस्वाच्या लढाईमुळे चिचघरे टोळीसोबत गेल्या काही दिवसांपासून टोकाचे वैमनस्य होते. अंकितची या भागात चांगली चलती आहे. त्याचे अवैध धंदे सुरू आहेत. त्याचे कोणतेही काम होते, ही बाब आरोपींना खटकत होती. तो पोलिसांचा खबरी आहे, असाही आरोपींना संशय आहे. त्यामुळे अंकितचे शत्रू त्याचा गेम करण्याची संधी शोधत होते. रविवारी रात्री ८.३० च्या सुमारास अंकित तहसीलमध्ये आला. तो गोळबार चौकाजवळच्या पटवी गल्लीतून जात असताना आरोपी रोशन चिंचघरे (वय २२), अंकूश चिंचघरे (वय २५) आणि सचिन चिंचघरे तसेच नितीन उर्फ मच्छी आणि राहुल (रा. सर्व पाचपावली) यांनी अंकितला घेरले. त्याच्यावर सत्तूर, गुप्तीसारख्या शस्त्राचे अनेक घाव घालून त्याची हत्या केली. आरोपींनी अंकितला एवढ्या निर्दयपणे मारले की त्याचा एक हात मनगटापासून तोडून टाकला. अत्यंत वर्दळीच्या भागात झालेल्या या अमानुष हत्याकांडामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. माहिती कळताच तहसीलचे ठाणेदार अजयकुमार मालवीय आपल्या सहका-यांसह आरोपींच्या शोधासाठी कामी लागले होते. सोमवारी पहाटे त्यांनी आरोपी रोशन आणि नितीनला ताब्यात घेतले. अन्य फरार आरोपींचा शोध सुरू आहे.आरोपींच्या मनात होती भीतीवर्षभरापूर्वी मित्र असलेल्या अंकित आणि आरोपी चिंचघरे टोळीत अलिकडे नेहमीच वाद व्हायचे. त्यांच्यात एक महिन्यापूर्वी कडाक्याचे भांडण झाले होते. यावेळी त्यांनी एकमेकांना संपविण्याची भाषा वापरली होती. अंकितचा गेम केला नाही तर तो आपल्याला संपवेल अशी चिंचघरे टोळीतील आरोपींना भीती वाटत होती. त्याचमुळे त्यांनी अंकितची हत्या केली.

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर