शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

दोन बॉटल दारूसाठी बांबूने प्रहार करत हत्या, रेल्वे लाईन शेजारी फेकला मृतदेह

By योगेश पांडे | Updated: August 1, 2024 16:10 IST

Nagpur : कुख्यात शेखूला अटक

योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दारूचे व्यसन असलेल्या एका व्यक्तीची बांबूने प्रहार करत हत्या करण्यात आली व त्याचा मृतदेह रेल्वे लाईनच्या शेजारी फेकण्यात आला. त्याने दोन बॉटल दारू न विचारता घेतल्याच्या कारणावरून त्याची हत्या करण्यात आली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या प्रकरणात सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र मृतकाच्या बहिणीच्या तक्रारीनंतर सूत्रे हलली व आरोपीला अटक करण्यात आली.

प्रमोद पॉल फ्रांसिस (५२, लुंबिनीनगर, मेकोसाबाग) असे मृतकाचे नाव आहे. त्याला दारूचे व्यनस होते व तो त्याची बहीण रंजना कांबळे यांच्यासोबत रहायचा. तो कुठलेही काम करत नव्हता व दिवसभर दारूच्या नशेत असायचा. अनेकदा तर या नशेत तो आठ आठ दिवस बाहेरच असायचा. ३० जुलै रोजी सकाळी ११ वाजता तो बैरामजी टाऊन खदान परिसरातील रेल्वे लाईनजवळ उभा होता. त्याच्या बहिणीने त्याला त्यावरून टोकले व त्या नोकरीवर निघून गेला. त्या रात्री तो घरी आलाच नाही. बुधवारी सकाळी एका मुलाने येऊन प्रमोद खदानजवळील रेल्वे लाईनच्या शेजारी एका झाडाखाली पडला असल्याची माहिती दिली. रंजना या कुटुंबियांसह तेथे पोहोचल्या असता प्रमोद निपचित पडला होता. त्यांनी पोलिसांना माहिती दिली व जरीपटका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र त्यांच्या परिचित असलेल्या एका डेकोरेशनवाल्याने प्रमोदची हत्या झाल्याची माहिती दिली. ३० जुलै रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास सिकंदर उर्फ शेखू शफी खान (३८, सिंधी कॉलनी, रेल्वेलाईनजवळ) याने प्रमोदवर लाकडी बांबूने प्रहार केले. त्यानंतरच प्रमोदचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. यानंतर रंजना यांनी जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी शेखूविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१) अंतर्गत गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे. चौकशीदरम्यान प्रमोदने शेखूच्या दारूअड्ड्यावरून दोन बॉटल न विचारता घेतल्याने संतापातून शेखूने त्याच्यावर हल्ला केल्याची बाब समोर आली.

आरोपी शेखूचा अवैध दारूचा अड्डाशेखूविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याला पिस्तुल व देशी कट्ट्याच्या तस्करीतदेखील अटक करण्यात आली होती. तो मेकोसाबाग परिसरात बऱ्याच काळापासून दारूचा अवैध अड्डा चालवितो. पोलिसांना याची माहिती असूनदेखील त्याच्यावर याबाबत कारवाई होत नव्हती. प्रमोद त्याच्याच अड्ड्यावर कधी कधी काम करायचा. त्याने न विचारता दारूच्या दोन बॉटल घेतल्याने शेखू संतापला व त्याने अड्ड्यावर त्याला बेदम मारहाण केली. यात प्रमोद बेशुद्ध पडला व त्याचा मृत्यू झाला. रात्रीच्या अंधारात त्याने प्रमोदचा मृतदेह रेल्वेलाईन शेजारी आणून टाकला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर