शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; ११ प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
2
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
3
आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२५ : आर्थिक लाभ, खोळंबलेली कामे...
4
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
5
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
6
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
7
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
8
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
9
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
10
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
11
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
13
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
14
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
15
दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या
16
कबुतरांसाठी जैन मुनींचे उपोषण; १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात होणार सुरुवात
17
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
18
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
19
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
20
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?

उपराजधानीत मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शंभरीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 12:49 IST

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे मोठ्या संख्येत मूत्रपिंड प्रत्यारोपण करणारे राज्यात पहिले रुग्णालय ठरले आहे.

ठळक मुद्देसुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ६३ वे प्रत्यारोपणही यशस्वी

सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन्ही मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांसाठी मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आशेचे किरण ठरले आहे. या रुग्णालयात आतापर्यंत ६३ मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले असून, शंभरीकडे वाटचाल सुरू आहे. विशेष म्हणजे, शासकीय रुग्णालयांमध्ये एवढ्या मोठ्या संख्येत मूत्रपिंड प्रत्यारोपण करणारे राज्यात हे पहिले रुग्णालय ठरले आहे.भारतात दरवर्षी मूत्रपिंड निकामी होणाऱ्या २.२ लाख नव्या रुग्णांची भर पडत आहे, ज्यामुळे दरवर्षी ३.४ कोटी डायलिसिसची अतिरिक्त मागणी निर्माण होत आहे. या विकारांच्या उद्भवाशी वयाचा फारसा संबंध आढळून येत नाही, कारण किशोरवयीन मुलांमध्ये तसेच बालकांमध्येही त्यांचे प्रमाण सारख्या वेगाने वाढत आहे. तज्ज्ञानुसार, मूत्रपिंड विकारामुळे येणाºया मृत्यूचे प्रमाण २०१६ मध्ये अकराव्या क्रमांकावर होते. या विकारावर मूत्रपिंड प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय आहे. याची दखल घेत नागपूर मेडिकलने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शासकीय रुग्णालयांमध्ये पहिले मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्र सुरू केले. ९ फेब्रुवारी २०१६ पहिल्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. त्यानंतर ते आतापर्यंत ६३ मूत्रपिंड प्रत्यारोपण होऊन रुग्णांना नवजीवन मिळाले आहे.गेल्या वर्षात २१ प्रत्यारोपणसुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्रात २०१६ मध्ये नऊ, २०१७ मध्ये १७, २०१८ मध्ये १३ तर २०१९ मध्ये २१ प्रत्यारोपण झाले, तर या वर्षात आतापर्यंत तीन प्रत्यारोपण झाले आहे. यात सर्वाधिक मूत्रपिंडदान आईने दिले आहेत. त्याची संख्या ३२ आहे. याशिवाय, वडिलांकडून १०, पत्नींकडून सहा, पतीकडून एक, बहिणीकडून तीन, भावाकडून दोन, मोठ्या वडिलांकडून एक तर ब्रेन डेड म्हणजे मेंदू मृत व्यक्तीकडून आठ मूत्रपिंड दान झाले आहे. नुकतेच झालेले ६३ वे मूत्रपिंड शाहीना परवीन या ३७ वर्षीय आईने आपल्या १४ वर्षीय मुलगा मोहम्मद नुमान याला दिले आहे.प्रत्यारोपणातील सहभागी चमूमूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असते. यामुळे प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा ठरतो. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्यासह विशेष कार्य अधिकारी डॉ. मिलिंद फुलपाटील, मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. संजय कोलते, मूत्रपिंड तज्ज्ञ डॉ. समीर चौबे, नेफ्रोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. चारुलता बावनकुळे, यूरोलॉजी विभागप्रमुख डॉ. धनंजय सेलूकर, डॉ. रितेश बनोदे, डॉ. पीयूष किंमतकर, डॉ. वंदना आदमने, डॉ. आशुतोष जयस्वाल, डॉ. वली, डॉ. मेहराज शेख व डॉ. प्रतीक लढ्ढा यांच्यासह इतरही विभागप्रमुख,परिचारिका व कर्मचाऱ्यांचा समावेश असतो.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय