शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

साप चावल्यामुळे महाराजबागेतील वाघिण ‘जाई’ची किडनी निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:09 IST

महाराजबाग प्राणिसंग्रहालयात ‘जाई’ वाघिणीच्या दोन्ही किडनी साप चावल्यामुळे निकामी झाल्या आहेत. वाघिण सक्रिय दिसत आहे, पण के्रटिनचा स्तर वाढल्यामुळे तिने खाणेपिणे सोडल्याने प्रकृती खालावली आहे, असे प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ठळक मुद्देखाणेपिणे सोडले, प्रकृती खालावली

आॅनलाईन लोकमतनागपूर : महाराजबाग प्राणिसंग्रहालयात ‘जाई’ वाघिणीच्या दोन्ही किडनी साप चावल्यामुळे निकामी झाल्या आहेत. वाघिण सक्रिय दिसत आहे, पण के्रटिनचा स्तर वाढल्यामुळे तिने खाणेपिणे सोडल्याने प्रकृती खालावली आहे, असे प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.रविवार, ५ नोव्हेंबरला सायंकाळी तिच्या पिंजऱ्यात प्रेक्षकांना साप दिसला होता. त्यानंतर पायात सूज असल्यामुळे ती लंगडत होती. वाघिणीची जखम पाहण्यासाठी तिला बेशुद्ध करणे आवश्यक आहे. पण साप चावल्यामुळे मनुष्य वा वन्यजीवाला बेशुद्ध करणे जोखिमेचे असते. त्यामुळे वाघिणीला बेशुद्ध करून साप चावल्याची जखम पाहणे कठीण आहे. वाघिणीला अ‍ॅन्टी स्नेक व्हॅनमचे इंजेक्शन देण्यात आले. त्यामुळे दुसऱ्या  दिवशी तिच्या पायाची सूज कमी झाली आणि तिने खाणेपिणे सुरू केले. त्यानंतर ९ नोव्हेंबरला पिंजऱ्यात सोडण्यात आले. पण वाघिणीने पुन्हा खाणेपिणे सोडले. अखेर १७ नोव्हेंबरला तिला ट्रीटमेंट केजमध्ये स्थानांतरित करण्यात आले. तिच्या रक्ताच्या नमुन्याची तपासणी केल्यानंतर किडनी निकामी झाल्याची बाब पुढे आली. सापाच्या विषाचा परिणाम थेट मूत्रपिंडावर पडला आहे. त्यामुळे तिची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. डॉ. सुनील बावस्कर, डॉ. नारायण दक्षिणकर, डॉ. गौतम भोजने, डॉ. विनोद धूत या डॉक्टरांची चमू तिच्यावर उपचार करीत आहेत.नऊ वर्षांपूर्वी आईपासून ताटातूटचंद्रपूर वनक्षेत्रात नऊ वर्षांपूर्वी आईपासून ताटातूट झालेले छावे जाई, जुई, जान, ली आणि चेरी कमजोर अवस्थेत आढळून आले होते. त्यांना २ नोव्हेंबर २००८ रोजी उपचारासाठी नागपूर महाराजबाग प्राणिसंग्रहालयात आणले होते. या छाव्यांपैकी जुईची प्रकृती गंभीर होती. तिला रक्त देण्यात आले, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ली, जान, चेरी आणि जाई महाराजबागेत मोठी झाली. काही वर्षांपूर्वी चेरीला छत्तीसगड येथील प्राणिसंग्रहालयात पाठविण्यात आले तर ‘ली’ला गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात ब्रीडिंगसाठी पाठविण्यात आले आहे. त्यानंतर महाराजबागेत वाघिण जान आणि जाई एकत्र राहतात.

टॅग्स :nagpurनागपूर