शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धाच्या अपहरणकर्त्याने आधीही केले होते दोघांचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:29 IST

चार वर्षीय श्रद्धा अरुण सारवाणे हिचे अपहरण करून तिला मेडिकलमध्ये सोडून देणारा आरोपी थामदेव श्रीधर मेंढूलकर (वय ३७, रा. खरबी) याने पाच महिन्यांपूर्वी दोन चिमुकल्यांचे अपहरण केले होते, अशी खळबळजनक माहिती उजेडात आली आहे.

ठळक मुद्देपाच महिन्यांपूर्वी कन्हानमध्ये गुन्हा : पोलीस कस्टडीत दिली कबुली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चार वर्षीय श्रद्धा अरुण सारवाणे हिचे अपहरण करून तिला मेडिकलमध्ये सोडून देणारा आरोपी थामदेव श्रीधर मेंढूलकर (वय ३७, रा. खरबी) याने पाच महिन्यांपूर्वी दोन चिमुकल्यांचे अपहरण केले होते, अशी खळबळजनक माहिती उजेडात आली आहे. आरोपी मेंढूलकर सध्या लकडगंज पोलिसांच्या कस्टडीत असून, त्यानेच पोलिसांना या गुन्ह्याची कबुलीवजा माहिती दिली आहे.१४ मार्चच्या दुपारी ४ च्या सुमारास आरोपी मेंढूलकरने चिमुकल्या श्रद्धाला कबुतर दाखवतो, असे म्हणून तिचे अपहरण केले आणि तिला मेडिकलमध्ये नेऊन सोडले. लकडगंज पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीची कसून शोधाशोध केली. त्यानंतर १९ मार्चला रात्री त्याच्या खरबी चौकाजवळ मुसक्या बांधल्या. कोर्टातून त्याचा २४ मार्चपर्यंत पीसीआर मिळाला होता. कोठडीत त्याने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली. नोव्हेंबर २०१७ च्या शेवटच्या आठवड्यात कन्हान गावात तो गेला होता. तेथे त्याला रस्त्यावर एक सहा वर्षांची मुलगी आणि आठ वर्षांचा मुलगा उभा दिसला. त्या दोघांजवळ जाऊन आरोपी मेंढूलकरने त्यांना ‘तुमच्या वडिलांनी बोलविले. चला तुम्हाला सोडून देतो’, असे म्हणून आपल्या दुचाकीवर बसवले. त्यानंतर मुलाला कन्हानमधीलच साई मंदिराजवळ सोडले. तर, मुलीला कामठीच्या शुक्रवारी बाजारात सोडून आरोपी पळून गेला. या प्रकरणात त्यावेळी कन्हान पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.कन्हान पोलीस घेणार ताब्यातआरोपीची पोलीस कोठडी संपल्याने त्याला कारागृहात पाठविण्यात येणार असून, तेथून त्याला कन्हान पोलीस ताब्यात घेतील. त्याला दोन चिमुकल्यांच्या अपहरणाच्या आरोपात अटक केल्यानंतर कन्हान पोलीस त्याची चौकशी करणार आहेत. वरून अतिशय साधा-भोळा वाटणारा आरोपी मेंढूलकर विकृतासारखा वागतो, असे पोलीस सांगतात. तो अत्यंत धूर्त असून, श्रद्धाच्या अपहरणात लुनाचा वापर केल्याचे वृत्तपत्रातून कळताच त्याने दुसऱ्या दिवशीपासून लुना वापरणे बंद केले होते. मात्र, पोलिसांनी सीसीटीव्हीवरून त्याचे छायाचित्र मिळवून त्याला शिताफीने अटक केली. 

टॅग्स :KidnappingअपहरणArrestअटक