शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

एक कोटीच्या खंडणीसाठी नागपुरात विद्यार्थ्याचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 10:11 IST

एका वाहतूक व्यावसायिकाच्या १६ वर्षीय मुलाचे एक कोटीच्या खंडणीसाठी अपहरण झाल्याचे वृत्त पुढे आले असून यामुळे पोलीस दलासह सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देवाहतूक व्यावसायिकाचा मुलगा तीन दिवसानंतर खुलासा

जगदीश जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका वाहतूक व्यावसायिकाच्या १६ वर्षीय मुलाचे एक कोटीच्या खंडणीसाठी अपहरण झाल्याचे वृत्त पुढे आले असून यामुळे पोलीस दलासह सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, वाहतूक व्यावसायिकाचा अपहृत मुलगा बारावीचा विद्यार्थी आहे. २ आॅक्टोबरला तो घरी असताना रात्री ८.३० च्या सुमारास त्याच्या मोबाईलवर काही फोन आले. त्यानंतर तो घरून बाहेर गेला. बराच वेळ होऊनही तो घरी परतला नाही. त्यामुळे चिंतित झालेल्या कुटुंबीयांनी त्याच्या मित्रांकडे आणि नातेवाईकांकडे चौकशी केली. काहीच माहिती मिळाली नाही त्यामुळे ३ आॅक्टोबरला पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली. अपहृत मुलगा बेपत्ता होण्यापूर्वी त्याच्या विद्यार्थी मित्रांच्या संपर्कात असल्याचे प्राथमिक चौकशीत पोलिसांच्या लक्षात आले.त्यामुळे पोलिसांनी संबंधित विद्यार्थी-विद्यार्थिनींकडे चौकशी केली. त्यांनी अपहृत मित्रासोबत संपर्क झाल्याचे मान्य केले. मात्र, तो कुठे गेला त्याबाबत अनभिज्ञता दर्शविली.दरम्यान, चौकशी सुरू असताना गुरूवारी रात्री अपहृत मुलाच्या मोबाईलवरून वडिलांना फोन आला.‘भुरू बोल रहा है क्या, तेरा बेटा हमारे पास है यदि उसे सहीसलामत होना है तो एक करोड़ रुपए लगेंगे’ असे म्हणून फोन कापला. यामुळे हादरलेल्या वाहतूक व्यावसायिकांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली.पोलिसांनी अपहृत मुलाशी जुळलेल्या दोन संशयास्पद युवकांवर नजर वळवली. ते दोघेही बेपत्ता असल्याचे कळाल्याने पोलिसांचा संशय वाढला. शुक्रवारी सकाळी या दोघांच्याही घरी पोलिसांनी धाव घेतली.एकाच्या कुटुंबीयांनी गुरुवारी रात्री तो दुसऱ्यासोबत कपडे घेऊन गेल्याचे म्हटले आहे. यामुळे या दोघांवर अपहरणाचा संशय अधिकच पक्का झाला आहे.

ठिकठिकाणी छापेमारीखंडणीसाठी यापूर्वी झालेले अपहरण आणि नंतरचा परिणाम लक्षात घेत पोलीस यंत्रणा कमालीची सक्रिय झाली आहे. त्यांनी या प्रकरणात अपहृत मुलाचा शोध घेऊन संशयितांना पकडण्यासाठी ठिकठिकाणी छापेमारी चालवली आहे. शहराच्या बाजूला असलेल्या जंगलात आणि निर्जन ठिकाणीही पोलिसांची छापेमारी सुरू आहे.

टॅग्स :Kidnappingअपहरण