शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बड्या बुकीच्या अपहरणाचा कट

By admin | Updated: March 2, 2016 03:10 IST

कुख्यात राजू भद्रे आणि दिवाकर कोतुलवारच्या टोळीने उपराजधानीतील एका बड्या बुकीसह अनेकांच्या अपहरणाचा कट रचला होता.

भद्रे-कोतुलवारचे होते प्लनिंग : तपासात खळबळजनक माहिती उघड नरेश डोंगरे नागपूरकुख्यात राजू भद्रे आणि दिवाकर कोतुलवारच्या टोळीने उपराजधानीतील एका बड्या बुकीसह अनेकांच्या अपहरणाचा कट रचला होता. अजय राऊत प्रकरणाची पोलिसांना कुणकुण लागली नसती तर ‘गैरकामा’त गुंतलेल्या ‘बड्यां’चे स्पॉट लावण्याचे प्लॅनिंग तयार होते. मात्र, राऊतच्या प्रकरणाची तक्रार अन् बोभाटा झाल्याने पुढचा कट उधळला गेला, अशी खळबळजनक माहिती पुढे आली आहे. उपराजधानीतील गुन्हेगारांच्या पहिल्या तीन टोळी प्रमुखांपैकी एक असलेला राजू भद्रे तसेच त्याचा राईट हॅण्ड दिवाकर कोतुलवार याने आपल्या टोळीतील गुंडांच्या मदतीने ११ डिसेंबर २०१५ ला दुपारी अजय राऊतचे अपहरण केले. त्याला बेदम मारहाण करून त्याच्या कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी देत त्याच्याकडून १ कोटी ७५ लाखांची खंडणी वसूल केली. नागपुरातील आतापर्यंतची सर्वात मोठी खंडणी ठरलेल्या या प्रकरणाचा गुन्हे शाखेने शिताफीने तपास करीत सूत्रधार राजू भद्रे याला १५ फेब्रुवारीला अटक केली. त्यानंतर कोतुलवारही न्यायालयात शरण आला. पोलिसांनी त्यांच्याकडून आलिशान कार तसेच १ कोटी ४२ लाख ५० हजार रुपये जप्त केले. विशेष म्हणजे, या गुन्ह्याची तक्रार देणाऱ्या राऊतने जीवाच्या भीतीने पोलिसांना आरोपींची नावे सांगितली नव्हती. आपण त्यांना ओळखत नसल्याचे राऊत सांगत होता. त्यामुळे पोलिसांनी कोतुलवारला संशयावरून चौकशीसाठी गुन्हे शाखेत आणले. मात्र, त्याने तब्बल तीनवेळा पोलिसांच्या चौकशीचा सराईतपणे सामना करून आपल्याला या प्रकरणाची कसलीही माहिती नसल्याचे म्हटले. त्याची एकूणच वर्तणूक त्यावेळी पोलिसांचाही अंदाज चुकविणारी ठरली.गोव्यातच झाले प्लॅनिंग उपराजधानीतील अनेक बुकी अन् मोठे जुगारी गोव्यात जुगार खेळायला जातात. बुकी अजय राऊतची तेथील कॅसिनोत चलती आहे. गोवा ट्रीपच्या आयोजनाची तोच तयारी करतो. खाणे, पिणे, जुगार खेळणे, विदेशी बाला, डान्स बार, मौजमस्तीसह जिंकलेल्या पैशाची नागपुरात लेनदेन करवून घेण्यात राऊतचाच पुढाकार असतो, असे सांगितले जाते. अशाच एका ट्रीप दरम्यान गोव्यात एका मोठ्या बुकीने भद्रे टोळीला करोडोंची खंडणी देऊ शकणाऱ्या ‘सावजांची’ नावे सांगितली. त्याची माहिती राऊतलाही होती, असे सांगितले जाते. मात्र, सोबत खाणे-पिणे असलेला राजू अन् दिवाकर आपलाच गेम करणार याची पुसटशीही कल्पना राऊतला नव्हती. त्यामुळे दिवाकरने उचलल्यानंतर जीवाच्या धाकाने पावणेदोन कोटींची खंडणी देऊन राऊतने आपली मानगुट सोडवून घेतली. नंतर मात्र ‘संभावित नावां’चा बोभाटा केला. त्यामुळे पोलिसांनीही कोतुलवारला बोलते केले अन् त्याने राऊतनंतर दुसऱ्या एका बड्या बुकीचा आणि त्यानंतर अनेकांचा ‘असाच गेम’ करणार होतो, अशी कबुली दिल्याचे पोलीस अधिकारी ‘आॅफ द रेकॉर्ड’ मान्य करतात.