शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अग्रवाल यांना निर्जन ठिकाणी नेऊन वसुलणार होते खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 21:20 IST

हल्दीराम फूड प्रा. लि. कंपनीचे मालक राजेंद्र अग्रवाल यांचे अपहरण करून त्यांना निर्जन ठिकाणी न्यायचे आणि अग्रवाल यांच्या नातेवाईकांकडून खंडणीची रक्कम मागायची, असा आरोपींचा कट होता. पोलिसांच्या तपासात आरोपींनी या प्रकारची कबुलीजबाबवजा माहिती तपास अधिकाऱ्यांना दिली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तविली आहे.

ठळक मुद्देहल्दीरामच्या मालकाच्या अपहरणाचा कट : आरोपींनी दिली पोलिसांना माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हल्दीराम फूड प्रा. लि. कंपनीचे मालक राजेंद्र अग्रवाल यांचे अपहरण करून त्यांना निर्जन ठिकाणी न्यायचे आणि अग्रवाल यांच्या नातेवाईकांकडून खंडणीची रक्कम मागायची, असा आरोपींचा कट होता. पोलिसांच्या तपासात आरोपींनी या प्रकारची कबुलीजबाबवजा माहिती तपास अधिकाऱ्यांना दिली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तविली आहे.मध्यभारतातील व्यापारी-उद्योजकांत प्रचंड खळबळ निर्माण करणाऱ्या या प्रकरणाचा उलगडा करून धंतोली पोलिसांनी २ जुलैच्या रात्री टळलेल्या या अपहरण कांडाचा सूत्रधार पप्पू ऊर्फ श्यामबहादूर समशेर सिंग (वय ४०, रा. हिवरीनगर), सौरभ भीमराव चव्हाण (वय २१), रोहित राजेंद्र घुमडे (वय २९), अतुल गोपाळ पाटील (वय २४), विनोद भूमेश्वर गेडाम (वय २३) यांना अटक केली. न्यायालयातून त्यांची ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळवण्यात आली आहे. त्यांचा साथीदार बाळू ऊर्फ नीलेश अंबाडरे (वय २७, रा. इमामवाडा) हा फरार आहे.अटकेतील आरोपींकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली एक मारुती व्हॅनही जप्त केली आहे. या आरोपींची गेल्या ४८ तासांपासून पोलीस चौकशी करीत आहेत. त्यांनी या गुन्ह्यात आणखी काही आरोपी असल्याची कबुली पोलिसांना दिल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, अग्रवाल यांना कळमेश्वर मार्गावर एका निर्जन ठिकाणी नेऊन तेथून त्यांच्या नातेवाईकांना फोन करायचा आणि खंडणीची रक्कम वसूल करायची, असाही आरोपींचा कट होता,असे आरोपींनी सांगितल्याचे समजते.

टॅग्स :Crimeगुन्हाKidnappingअपहरण