शहरं
Join us  
Trending Stories
1
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

संग्राम बारमध्ये ‘खुनी संग्राम’

By admin | Updated: June 11, 2014 01:38 IST

आॅर्केस्ट्रातील गाण्यावर बारबालांचे थिरकणे सुरू असतानाच एका गाण्याच्या फर्माईशवरून काल मध्यरात्री कोतवाली हद्दीतील जगनाडे चौकानजीकच्या संग्राम बारमध्ये झालेल्या खुनी संग्रामात एक ठार आणि अन्य एक

गाण्याची फर्माईश कारणीभूत : एक ठार, एक जखमीनागपूर : आॅर्केस्ट्रातील गाण्यावर बारबालांचे थिरकणे सुरू असतानाच एका गाण्याच्या फर्माईशवरून काल मध्यरात्री कोतवाली हद्दीतील जगनाडे चौकानजीकच्या संग्राम बारमध्ये झालेल्या खुनी संग्रामात एक ठार आणि अन्य एक जण गंभीररीत्या जखमी झाला. या घटनेने जगनाडे चौक परिसरात आणि सीताबर्डी भागात दहशतीचे वातावरण पसरले आहे. सुमित सुरेश तिवारी (३०), असे मृताचे नाव आहे. मोहम्मद रियाज हक (३०), असे जखमीचे नाव आहे. ते सीताबर्डी टेम्पल बाजार पिंजारी गल्ली येथील रहिवासी आहेत. नगरसेवक प्रशांत धवड यांच्या पत्नीच्या नावे हा बार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बारला आॅर्केस्ट्राचा (मनोरंजन) परवाना आहे. परवान्याआड अधूनमधून या बारमध्ये ‘डान्स’ चालतात. आॅर्केस्ट्रात गाणाऱ्या दोन तरुणींसह एकूण सहा बाला या बारमध्ये असतात. या बालांचा पुरवठा राजू दलाल करीत असतो. सात-आठ वर्षांपूर्वी त्याच्याच भरवशावर सीताबर्डीत शेरे पंजाबमध्ये ‘डान्स फ्लोअर’ चालायचा. या प्रकरणातील मृत सुमित तिवारी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याने काही वर्षांपूर्वी सीताबर्डी भागात कल्लू यादव आणि गाडगीलवार , अशा दोन जणांचा खून केलेला आहे.डान्स चालू है क्या?या दोन्ही खुनात सबळ पुराव्या अभावी संशयाचा लाभ मिळून तो निर्दोष सुटला होता. सोमवारी रात्री सुमित तिवारी हा सीताबर्डीतीलच त्याचे मित्र मोहम्मद सलाम मोहम्मद सुफी (४७), मोहम्मद रियाज आणि आणखी दोन-तीन जणांसोबत हॉटेल राजसन्समध्ये बसले होते. त्यांना डान्स पाहण्याची इच्छा झाली. रात्री ११ वाजताच्या सुमारास त्यांनी संग्राम बारचा व्यवस्थापक किशोर याला फोन करून ‘डान्स चालू है क्या’, अशी विचारणा केली. त्याने होकार देताच मोहम्मद सलाम, रियाज आणि सुमित हे दोन अल्पवयीन मुलांना सोबत घेऊन संग्राम बारमध्ये दाखल झाले. रात्री १.३० ते १.४५ वाजताच्या सुमारास कार्यक्रम रंगात आलेला असतानाच मोहम्मद सलाम याने आपल्या आवडत्या गाण्याची फर्माईश केली. त्यामुळे इतर चार-पाच अनोळखी लोक चिडले. त्यांच्यात भांडण झाले. परिणामी अनोळखी लोकांनी सलामसोबतच्या मोहम्मद रियाज याच्यावर सशस्त्र हल्ला केला. त्याला वाचविण्यासाठी सुमित तिवारी धावला असता त्याला या अनोळखी हल्लेखोरांनी सशस्त्र हल्ला करून आणि दगडाने ठेचून घटनास्थळीच ठार केले. या घटनेची माहिती मिळताच कोतवाली आणि पोलीस नियंत्रण कक्षातील पोलीस ताफ्याने घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी मृत सुमित याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकल कॉलेज इस्पितळाकडे रवाना केला. मोहम्मद सलाम याच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी अनोळखी लोकांविरुद्ध भादंविच्या १४३, १४७, १४८, ३०२, भारतीय हत्यार कायद्याच्या ४/२५ आणि मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अद्यापही आरोपींना अटक केलेली नाही. मात्र संशयित म्हणून बार मॅनेजर, वेटर, इतर कर्मचारी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. घटनेच्या वेळी सीसीटीव्ही कॅमेरा होता. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने हल्लेखोरांची माहिती जाणून घेतली जात आहे. सुमितचा खून सिंबले बंधू आणि साथीदारांनी केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान जखमी मोहम्मद रियाज याला धंतोलीच्या श्युअरटेक इस्पितळात दाखल करण्यात आलेले आहे. (प्रतिनिधी)