शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील खाऊगल्ली बनली असामाजिक तत्त्वांचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 22:30 IST

महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बंडू राऊत यांनी खाऊगल्लीची संकल्पना बजेटमध्ये ठेवली होती. रमण विज्ञान केंद्रासमोरील जागेची निवड करण्यात आली होती. ८० लाख खर्च करून येथे प्लॉस्टिकचे डोम तयार करण्यात आले. लाखो रुपये खर्चून टाईल्स लावण्यात आल्या, आवश्यक सोयीसुविधा विकसित करण्यात आल्या. परंतु अडीच वर्षानंतरही खाऊगल्लीच्या उद्घाटनाचा मुहूर्त निघाला नाही. आज खाऊगल्लीची दुरावस्था झाली आहे. तिथे असामाजिक तत्त्वांचा अड्डा बनला आहे.

ठळक मुद्देलाखोंचा झाला खर्च : उद्घाटनाच्या प्रतिक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बंडू राऊत यांनी खाऊगल्लीची संकल्पना बजेटमध्ये ठेवली होती. रमण विज्ञान केंद्रासमोरील जागेची निवड करण्यात आली होती. ८० लाख खर्च करून येथे प्लॉस्टिकचे डोम तयार करण्यात आले. लाखो रुपये खर्चून टाईल्स लावण्यात आल्या, आवश्यक सोयीसुविधा विकसित करण्यात आल्या. परंतु अडीच वर्षानंतरही खाऊगल्लीच्या उद्घाटनाचा मुहूर्त निघाला नाही. आज खाऊगल्लीची दुरावस्था झाली आहे. तिथे असामाजिक तत्त्वांचा अड्डा बनला आहे.खाऊगल्लीमध्ये ३० डोम लावण्यात आले आहे. हे डोम तुटलेले आहे. टाईल्स निघालेल्या आहे. ज्या सुविधा करण्यात आल्या होत्या. त्या सुद्धा आता अस्ताव्यस्त झाल्या आहे. आता तर खाऊगल्ली ही असामाजिक तत्त्वांचा अड्डा झाला आहे. अंधार झाला की, दारुड्यांची मैफिल, अमली पदार्थांचे सेवन करणारे येथे दिसतात. दुपारच्या सुमारास भिकारी येथे झोपा काढतात. प्रेमी युगुलही अश्लील चाळे येथे करीत असतात. ज्या उद्देशाने खाऊगल्ली साकारण्यात आली होती आज तिची दुरवस्था झाली आहे.विशेष म्हणजे बंडू राऊत यांच्यानंतर स्थायी समितीच्या कुठल्याच अध्यक्षांनी खाऊगल्लीबाबत उत्साह दाखविला नाही. स्थानिक काँग्रेसचे नगरसेवक हर्षला मनोज साबळे यांनी खाऊगल्ली सुरू करण्यासंदर्भात अनेकदा प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही.दर जास्त असल्यामुळे दुकान घ्यायला कुणी तयार नाहीखाऊगल्लीमध्ये दुकान लावण्यासाठी अनेकवेळा उद्यान विभागामार्फत निविदा काढण्यात आल्या. परंतु निविदा भरण्यासाठी कुणीही पुढे आले नाही. मिळालेल्या माहितीनुसार एका दुकानदाराकडून १० हजार रुपये महिना भाडे घेण्याचा प्रस्ताव आहे व १० हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट सुद्धा द्यायचे आहे. त्याचबरोबर काही अटी आणि शर्तीही ठेवण्यात आल्या आहे. त्यामुळे या गल्लीची रौनक अद्यापही येऊ शकली नाही.भाडे अर्धे करावे - साबळेनगरसेवक हर्षला साबळे यांचे म्हणणे आहे की, खाऊगल्लीची संकल्पना खरंच चांगली होती. मात्र मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे याचे उद्घाटन होऊ शकले नाही. भाडे १० हजाराऐवजी ५ हजार रुपये ठेवणे आवश्यक होते. सिक्युरिटी डिपॉझिट सुद्धा घ्यायला नको. पहिले खाऊगल्लीचे उद्घाटन होणे गरजेचे आहे. लोक जसजसे येतील, तसतसा किराया वाढवायला हरकत नाही. खाऊगल्लीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे सर्व नासधूस झाली आहे. त्यामुळे खाऊगल्लीचे उद्घाटन होणे गरजेचे आहे. जर मनपा प्रशासनाने लवकरच पावले उचलली नाही, तर पावसाळ्यानंतर येथे हॉकर्सला बसवावे लागेल.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका