शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

खासदार महोत्सव : शब्दाविना सजली स्वरांची तालयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:21 IST

मानवी मनाला उच्च कोटीचा आनंद देणारी गोष्ट म्हणजे संगीत. निसर्गाच्या कनाकनात हे संगीत सामावले आहे. एकदा हे संगीत कानामनात उतरले की शब्दाविना पराकोटीचा आनंद देणारे असते. अगदी हाच आनंद शब्दाविना सजलेल्या तालयात्रेत नागपूरकरांनी शुक्रवारी अनुभवला. दिनमानानुसार वाढलेला सायंकाळचा गारवा आणि अशात आकाशाखाली रंगलेली तालवाद्यांची मैफिल. जगप्रसिद्ध कलावंत राकेश चौरसिया यांच्या बासरीचे सुमधूर स्वर, त्यांच्या संचातील कलावंतांकडून विविध वाद्यांवर दाखविलेले कौशल्य आणि एकट्याने अनेक वाद्यांवरून थेट संवाद साधणारे विख्यात कलावंत शिवमणी. या कलावंतांद्वारे सादरीत अनोख्या फ्यूजनला ‘वा क्या बात है’ अशी दाद देत, मनमुराद आनंद रसिकांनी अगदी तल्लीन होउन लुटला.

ठळक मुद्देभारतीय व पाश्चिमात्य संगीत यांच्या मिश्र संगीताचा मिलाप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मानवी मनाला उच्च कोटीचा आनंद देणारी गोष्ट म्हणजे संगीत. निसर्गाच्या कनाकनात हे संगीत सामावले आहे. एकदा हे संगीत कानामनात उतरले की शब्दाविना पराकोटीचा आनंद देणारे असते. अगदी हाच आनंद शब्दाविना सजलेल्या तालयात्रेत नागपूरकरांनी शुक्रवारी अनुभवला. दिनमानानुसार वाढलेला सायंकाळचा गारवा आणि अशात आकाशाखाली रंगलेली तालवाद्यांची मैफिल. जगप्रसिद्ध कलावंत राकेश चौरसिया यांच्या बासरीचे सुमधूर स्वर, त्यांच्या संचातील कलावंतांकडून विविध वाद्यांवर दाखविलेले कौशल्य आणि एकट्याने अनेक वाद्यांवरून थेट संवाद साधणारे विख्यात कलावंत शिवमणी. या कलावंतांद्वारे सादरीत अनोख्या फ्यूजनला ‘वा क्या बात है’ अशी दाद देत, मनमुराद आनंद रसिकांनी अगदी तल्लीन होउन लुटला.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार महोत्सवाच्या माध्यमातून तालयात्रेचा ‘फ्यूजन’ सोहळा शुक्रवारी संत्रानगरीच्या रसिकांनी अनुभवला. अर्थातच या कार्यक्रमाला तरुणांनी मोठी गर्दी केली होती. सुरुवातीच्या सत्रात बासरीवादक राकेश चौरसिया व त्यांच्या संचातील दिग्गज कलावंतांच्या स्वर-तालाच्या फ्यूजनचा आनंद रसिकांना मिळाला. पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य व पुतने राकेश चौरसिया यांनी बासरीच्या माधुर्याची रसिकांवर बरसात केली. सुरांशी लीलया खेळत त्यांचे समेवर येणे परत वादनातील तयारी पेश करत इतर वाद्यांच्या साथीने रसिकांना मोहवून गेले. कृष्णाच्या लडिवाळ बासरीचे मंत्रमुग्ध करणारे स्वर त्यांनी आसमंतात भरुन टाकले होते. पहाडी धूनच्या स्वरांनी श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला. त्यांच्यासोबत ड्रमवादक जिनो बँक्स, तबलावादक सत्यजित तळवळकर, बास गिटारवादक शेल्डन डिसिल्वा आणि कीबोर्डवादक संगीत हल्दीपूर यांनी तालयात्रेचा अक्षरश: रंग उधळला. या फ्यूजनमध्ये मध्येच इतर कलावंत थांबून एका कलावंताचे स्वर निनादायचे आणि श्रोते अवाक् होउन ते ऐकत राहायचे. जिनो बँक्सच्या ड्रमवरील आणि सत्यजितच्या तबल्यावरील कौशल्यासोबत रसिकांच्या टाळयांचे स्वर जुळले. संजय दास यांची गिटार आणि शेल्डनची बास गिटार अशीच श्रोत्यांना तल्लीन करून गेली. प्रत्येक कलावंताच्या स्वतंत्र सादरीकरणावर श्रोत्यांनी टाळयांचा कडकडाटाने दाद दिली. पुढे ‘होंठो से छुलो तुम..., तुम इतना जो मुस्कुरा रही हो..., मेरी आवाजही पेहचान है..., छुकर मेरे मनको..., पल पल दिल के पास, निले निले अंबर पर..., भिगी भिगी रातो मे..., तेरे मेरे होठों पर मिठे मिठे गीत..., जग घुमिया..., चलते चलते मेरे ये गीत...’ अशा गीतांवर राकेश यांच्या बासरीचे स्वर निनादले आणि श्रोत्यांचे भान हरपले. 

दुसऱ्या सत्रात जादू चढली ती शिवमणी या अद्भूत कलावंताची. सर्व वाद्य वाजविणारा एकटाच संगीतकार अशी त्याची ओळख. लहान डफली वाजवितच त्याने मंचावर प्रवेश केला. पुढे एक-एक वाद्यावर रिदम तपासली. एक-दोन नव्हे तर मंचावर असलेल्या २० च्या जवळपास वेगवेगळ्या वाद्यांवर आपले कसब दाखवित, श्रोत्यांना अक्षरश: आश्चर्याने तोंडात बोट घालायला भाग पाडले. श्रोते अवाक होउन त्याचे हे कसब पाहत होते. त्याच्या वादनाने हा सोहळा उत्तरोत्तर रंगत गेला. अखेर राकेश चौरसिया यांची बासरी व शिवमणीचे वादन याच्या फ्यूजनने या अलौकीक सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. यांचा झाला सत्कारयावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते निवेदक किशोर गलांडे, गिटारवादक योगेश ठाकर, गायक हफीज भाई, गायक व संगीतकार ओ.पी. सिंह, गझल गायक शिशिर पारखी, हार्मोनियमवादक विजय बोरीकर, संगीत गायक वर्षा बारई, निवेदक व साहित्यिक प्रकाश एदलाबादकर, तबलावादक हर्षल ठाणेकर या कलावंतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार प्रा. अनिल सोले, सुधाकर कोहळे, जयप्रकाश गुप्ता आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Member of parliamentखासदारcultureसांस्कृतिक