आॅनलाईन लोकमतनागपूर : गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत खर्ऱ्याने हाणामारी घडविली. या हाणामारीत पिता-पुत्राला लोखंडी पाईपने मार बसला, तर ही मारहाण करणाऱ्या दोघांना पोलीस कारवाईचा सामना करावा लागला.गोरेवाडा, माधवनगरात नारायण श्रीराम यादव (वय ५४) यांचे घर आहे. रविवारी रात्री ११ च्या सुमारास नारायण यांचा मुलगा संजययादव (वय २०) हा घरातून घाईगडबडीत खर्रा थुंकण्याकरीता बाहेर आला. त्याने तोंडातून पिचकारी सोडली अन् नेमक्या वेळी तेथून राहुल शंभू टेकाम (वय २५) हा तेथून जात असल्यामुळे ख खर्ऱ्याची थूंक टेकामच्या अंगावर पडली. त्यामुळे त्याने राहुलला शिवीगाळ केली. वाद आणि हाणामारी वाढल्याने नारायण यादव मध्यस्थी करण्याकरिता आले. ते पाहून चांगुल टेकाम लोखंडी पाईप हातात घेऊन आला आणि त्याने यादव यांच्या उजव्या खांद्यावर मारून गंभीर जखमी केले तर संजयच्या पायावर पाईपचा फटका मारून त्यालाही जखमी केले. शेजाऱ्यांनी धाव घेऊन वाद सोडवला. त्यानंतर यादव यांच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी राहुलला अटक केली. पुढील तपास सुरू आहे.
खर्रा थूंकला, लाथा पडल्या, पिता-पुत्र झाले जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:18 IST
गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत खर्ऱ्याने हाणामारी घडविली. या हाणामारीत पिता-पुत्राला लोखंडी पाईपने मार बसला, तर ही मारहाण करणाऱ्या दोघांना पोलीस कारवाईचा सामना करावा लागला.
खर्रा थूंकला, लाथा पडल्या, पिता-पुत्र झाले जखमी
ठळक मुद्देनागपुरात हाणामारी , आरोपीला अटक, दुसरा फरार