शहरं
Join us  
Trending Stories
1
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
2
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
4
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
5
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
6
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
7
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
8
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
9
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
10
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
11
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
12
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
13
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
14
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
15
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
16
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
17
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
18
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
19
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
20
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

नागपुरात खर्रा-सिगारेटची होतेय ब्लॅकमार्केटिंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 18:55 IST

कोरोनाचे संसर्ग होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणा डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावत आहेत. सगळी दुकाने बंद आहेत. पानठेले सुद्धा बंद करण्यात आली आहेत. असे असतानाही काही नागरिक कायद्या धाब्यावर ठेऊन आपले व्यवहार करत असल्याचे दिसून येते. शहरात अनेक ठिकाणी खर्रा व सिगारेटचे ब्लॅकमार्केटिंग सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.

ठळक मुद्देपं. मालवीयनगर चौकात सर्रास होतेय विक्रीपोलीसांच्या हातावर तुरी देऊन शौकीन पडताहेत बाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचे संसर्ग होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणा डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावत आहेत. सगळी दुकाने बंद आहेत. पानठेले सुद्धा बंद करण्यात आली आहेत. असे असतानाही काही नागरिक कायद्या धाब्यावर ठेऊन आपले व्यवहार करत असल्याचे दिसून येते. शहरात अनेक ठिकाणी खर्रा व सिगारेटचे ब्लॅकमार्केटिंग सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.वर्धा महामार्गावरील पं. मालवीयनगर चौकात खर्रा व सिगारेटचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येते. जयप्रकाशनगर ते पांडे ले-आऊट दरम्यान पूर्वीच्या विज माता मंदिरापासून जाणाऱ्या जयताळा रोडवर हा प्रकार दिसून येत आहे. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात केवळ भाजी-फळ विक्रेत्यांना ठेले लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. दैनंदित अत्यावश्यक सेवेत येणाºया या सेवा नागरिकांची धावपळ होऊ नये म्हणून ही सुविधा शासनातर्फे मुक्त करण्यात आली आहे. मात्र, या सेवेच्या नावाखाली काही व्यावसायिक आरोग्याशी खेळ करत असल्याचे दिसून येते. फळ व भाजी विके्रत्यांकडे हे व्यावसायिक खर्रा व सिगारेटचे पुडे ठेवत आहेत. पोलीस सहसा भाजीविके्रत्यांना व फळ विक्रेत्यांना जाब विचारत नसल्याचा हा गैरफायदा घेतला जात असल्याचे स्पष्ट होत आहेत. फळ आणि भाज्यांच्या ढिगाºयाखाली या वस्तू ठेऊन व्यसनाधिन व्यक्तीची ओळख झाली की त्यांना खर्रा व सिगारेट विकले जात आहे. जो खर्रा सामान्य काळात २० रुपयाला विकला जात होता, तोच खर्रा ४५ रुपयांना विकला जात आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे खर्रे १५० रुपयापर्यंत विकले जात आहेत तर सिगारेटची एक कांडी २५ ते ३० रुपयाला विकली जात आहे. विशेष म्हणजे, व्यसनाधिन माणसे सर्रास खरेदी करत आहेत आणि यामुळे लोक घराबाहेर पडत असल्याचे दिसून येते. पोलीसांची गाडी दिसताच सर्वत्र शांतता असते. गाडी केली लगेच फळ व भाजीविके्रत्यांकडे एकामागून एक व्यसनी व्यक्ती खर्रा व सिगारेट खरेदी करण्यासाठी येत असल्याचे चित्र सकाळ ते संध्याकाळ दिसून येत आहे. केवळ नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी पोलीस यंत्रणा भर उन्हात आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, विके्रत्यांना त्यांच्या परीश्रमाचे काहीच सोयरसुतक नसल्याचे दिसून येते. अशाच प्रकारचा गोरखधंदा सोमवारी क्वार्टर, खरबी, वाठोडा, नंदनवन झोपडपट्टी, वर्धमाननगर, महाल या भागात फळ, भाजी विक्रेत्यांच्या व किरणा दुकानाच्या आळ केला जात आहे. याकडे प्रशासनाने विशेषत्त्वाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस