शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
3
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
4
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
5
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
6
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
7
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
8
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
9
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
10
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
11
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
12
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
13
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
14
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
15
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
16
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
17
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
18
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
19
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
20
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."

मेट्रो रेल्वेविरुद्धची याचिका खारीज

By admin | Updated: October 26, 2016 03:03 IST

मेट्रो रेल्वेच्या डब्यांचे डिझाईन, उत्पादन, पुरवठा, तपासणी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण यासंदर्भातील निविदा

हायकोर्ट : भारत अर्थ मुव्हर्स कंपनीला दणकानागपूर : मेट्रो रेल्वेच्या डब्यांचे डिझाईन, उत्पादन, पुरवठा, तपासणी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण यासंदर्भातील निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी भारत अर्थ मुव्हर्स कंपनीची तांत्रिक बोली अपात्र ठरविण्याचा नागपूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशनचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात कायम राहिला आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी मंगळवारी या निर्णयाविरुद्धची याचिका फेटाळून कंपनीला दणका दिला. ही याचिका कंपनीने दाखल केली होती.मेट्रो कार्पोरेशनने २५ जानेवारी रोजी नोटीस जारी करून मेट्रो रेल्वेच्या डब्यांचे उत्पादन व इतर बाबींसाठी निविदा आमंत्रित केल्या होत्या. निविदा प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या कंपनीला मेट्रो रेल्वेच्या डब्यांचे डिझाईन व उत्पादनाचा १० वर्षांचा अनुभव आवश्यक होता. याशिवायही विविध पात्रता निकष होते. कार्पोरेशनने २९ सप्टेंबर रोजी भारत अर्थ मुव्हर्स कंपनीला ई-मेल पाठवून त्यांची तांत्रिक बोली अपात्र ठरविण्यात आल्याचे कळविले. हा निर्णय रद्द करून तांत्रिक बोलीचा पुनर्विचार करण्यात यावा, आर्थिक बोली उघडण्यात यावी व तेव्हापर्यंत निविदा वाटप करण्यास मनाई करण्यात यावी, अशी विनंती कंपनीने न्यायालयाला केली होती. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता कार्पोरेशनचा निर्णय योग्य ठरविला. कंपनीतर्फे अ‍ॅड. कार्तिक शुक्ल तर, कार्पोरेशनतर्फे वरिष्ठ वकील एस. के. मिश्रा व अ‍ॅड. कौस्तुभ देवगडे यांनी कामकाज पाहिले.(प्रतिनिधी)