शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रणजित पाटील यांच्याविरुद्धची याचिका खारीज

By admin | Updated: March 7, 2017 02:07 IST

गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याचा आरोप करणारी रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी खारीज केली.

हायकोर्ट : बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याचा होता आरोपनागपूर : गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याचा आरोप करणारी रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी खारीज केली. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांनी हा निर्णय दिला. या निर्णयामुळे डॉ. पाटील यांना दिलासा मिळाला आहे.मूर्तिजापूर (अकोला) येथील सामाजिक कार्यकर्ते विक्रांत काटे यांनी ही रिट याचिका दाखल केली होती. १९९१ ते २००४ या काळात वैद्यकीय अधिकारी असताना डॉ. पाटील यांनी लक्षावधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याची तक्रार काटे यांनी २० डिसेंबर २०१४ रोजी केली होेती. या तक्रारीची दखल घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. विभागाने चौकशीनंतर पाटील यांना ‘क्लीन चिट’ दिली. यावर काटे यांचा आक्षेप होता. चौकशी योग्य पद्धतीने झाली नाही असा आरोप त्यांनी करून डॉ. पाटील यांच्यावर कडक कारवाई करण्याची विनंती याचिकेत केली होती.न्यायालयाने ६ डिसेंबर २०१६ रोजी डॉ. पाटील व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून बाजू स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर डॉ. पाटील यांनी आयकर विभागाकडे अर्ज करून १९९१ ते २००४ या काळातील स्वत:च्या मालमत्तेचे विवरण मागितले. आयकर विभागाने त्यांच्याकडे सहा वर्षांपर्यंतच्याच कागदपत्रांचे जतन केले जात असून त्यानंतरची कागदपत्रे ठेवणे त्यांना बंधनकारक नसल्याचे डॉ. पाटील यांना पत्राद्वारे कळविले. तसेच, १९९१ ते २००४ या काळातील डॉ. पाटील यांच्या मालमत्तेचे विवरण देण्यास असमर्थता दर्शविली. डॉ. पाटील यांनी या पत्रासह आवश्यक स्पष्टीकरणाचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले. न्यायालयाने त्यांचे उत्तर समाधानकारक ठरविले व यासह अन्य विविध बाबी लक्षात घेता काटे यांची याचिका खारीज केली.(प्रतिनिधी)