शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत आता मिळणार खादी बनविण्याचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 09:55 IST

खादी ही भारताची ओळख आहे. हेच खादीचे महत्त्व कायम राखण्यासाठी केंद्र शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यानुसार नागपुरात खादी बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारकडून मिळाला निधी

रिता हाडके।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खादी ही भारताची ओळख आहे. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाला खादीचे महत्त्व आणखीनच वाढते. हेच खादीचे महत्त्व कायम राखण्यासाठी केंद्र शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यानुसार नागपुरात खादी बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.केंद्र सरकारतर्फे पाच खादी संस्थांना प्रशिक्षण केंद्र चालविण्यासाठी ‘खादी रिफॉर्म डेव्हलपमेंट प्रोग्राम’ अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पुढील महिन्यापासून नागपूर, मूल, वर्धा, भंडारा, पुलगाव येथील खादी संस्थांना त्यांच्या क्षमतेनुसार केंद्र सरकार चरखे उपलब्ध करून देणार आहे. येथे शेकडो महिला-पुरुष खादी बनविण्याचे नि:शुल्क प्रशिक्षण घेऊ शकतील. सोबतच त्यांना रोजगारही देण्यात येणार आहे. नाशिक येथील केंद्र सरकारचे खादी ग्रामोद्योग आयोगाचे प्रशिक्षण केंद्र मागील १७ वर्षांपासून बंद पडलेले आहे. यामुळे खादी कार्यकर्ता व खादी पॉलिवस्त्र कार्यकर्त्यांना प्रशिक्षण न मिळाल्यामुळे त्यांची संख्या कमी झाली आहे. खादीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे खादी ग्रामोद्योग आयोग मंडळ उपविभागीय कार्यालयाला विशेष निधी पुरवून खादी बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.बेरोजगारांना मिळेल रोजगारनागपुरात खादी ग्रामोद्योग भवन गांधीसागर तलाव येथे ८० चरखे, ग्रामसेवा मंडळ वर्धा, भंडारा जिल्हा सहायक समिती, प्रगती बहुउद्देशीय संस्था पुलगाव व नाग विदर्भ चरखा मूलला निधी व चरखे पुरविण्यात येत आहेत. ३० टक्के रक्कम खादी कामगार व १० टक्के रक्कम खादी संबंधित कार्यकर्त्याच्या खात्यात जमा होईल.सूत कातण्यासाठी ७.३० रुपये मिळणारकेंद्र सरकारने १ जानेवारी २०१८ पासून एक बंडल सूत कातण्यासाठी ७.३० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. आता सूत कातण्याचे काम करणारी महिला दिवसभरात ६ तास काम करून १५० ते २०० रुपये मिळवू शकते.फेब्रुवारी महिन्यात प्रशिक्षण‘फेब्रुवारी महिन्यापासून खादी प्रशिक्षकांकडून महिला-पुरुषांना खादी बनविण्याचे नि:शुल्क प्रशिक्षण व रोजगार देण्यात येईल. सोबतच ३० टक्के सवलतीचा लाभ खादी संस्थांना, खादी कामगार व खादी संबंधित कार्यकर्त्यांना मिळेल.’-राजेंद्र खोडके, सहायक संचालक,खादी ग्रामोद्योग आयोग उपप्रादेशिक कार्यालय नागपूर

टॅग्स :Khadiखादी