शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

नागपुरातील सुपर स्पेशालिटीत रुग्णाला ठेवले सहा तास ताटकळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 10:24 IST

गंभीर आजार आणि त्याचा वैद्यकीय उपचाराचा खर्च न पेलवणाऱ्या गोरगरीब रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना फायद्याची ठरत असली तरी या योजनेतील कर्मचारी कामचुकारपणा करीत असल्याने याचा फटका रुग्णांना बसत आहे.

ठळक मुद्देकामचुकारपणामुळे रुग्णांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गंभीर आजार आणि त्याचा वैद्यकीय उपचाराचा खर्च न पेलवणाऱ्या गोरगरीब रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना फायद्याची ठरत असली तरी या योजनेतील कर्मचारी कामचुकारपणा करीत असल्याने याचा फटका रुग्णांना बसत आहे. गुरुवारी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या एका हृदयरोगाच्या महिलेला योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तब्बल सहा तास ताटकळत ठेवले. वरिष्ठांचा वचक नसल्याने येथे मनमानेलपणा सुरू असल्याच्या रुग्णांच्या तक्रारी आहेत.दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) व दारिद्र्यरेषेवरील (एपीएल) नागरिकांच्या जटील आजारांच्या शस्रक्रिया मोफत करण्यासाठी शासनाने २१ नोव्हेंबर २०१३ पासून संपूर्ण राज्यात ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ सुरू केली. शासनाने या योजनेत खंड न पडू देता १ एप्रिल २०१७ पासून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना हे नवे नाव देऊन योजना सुरू ठवेली. नाव बदलल्याने योजनेता नवे उपचार व शस्त्रक्रियांची भर व अनुदान अडीच लाखापर्यंत वाढविण्याची शक्यता होती. परंतु आता वर्ष होत असताना कुठलाही बदल झालेला नाही. यातच नागपुरात या योजनेचे कार्य टीपीए (थर्ड पार्टी अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) पॅरामाऊंट कंपनीकडून काढून नव्या कंपनीला देण्यात आल्याने गोंधळ उडाला आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या लाभार्थींना मंजुरी मिळण्यापासून ते रुग्णालयातून सुटी घेण्यासाठीचे सर्व सोपस्कार रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना तासन्तास कार्यालयात घालवून पार पाडावे लागत आहे.गुरुवारी मीना मोंडेकर ही हृदयविकाराची रुग्ण ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत नाव समाविष्ट करण्यासाठी सकाळी ८ वाजतापासून कार्यालयात येऊन बसली. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गेल्या आठ दिवसांपासून ती भरती आहे. मात्र कार्यालयातील आरोग्य अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांनी सहा तास ताटकळत ठेवत दुपारी ३ वाजता तिचे नाव योजनेत समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली. असे प्रकार येथे रोजच होत असल्याचे येथील एका रुग्णाच्या नातेवाईकाने सांगितले. या उलट मेडिकल आहे. तिथे योजनेच्या कार्यालयात रुग्णांना न बोलविता आरोग्य मित्र किंवा निवासी डॉक्टर त्यांचे काम पाहतात. ‘सुपर’ला नवे ‘ओएसडी’ मिळाले आहेत, त्यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल