शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्थानक, रेल्वेगाड्या स्वच्छ ठेवा : सोमेश कुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 22:02 IST

रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानुसार मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्या नेतृत्वात बुधवारी स्वच्छता पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला. त्यांनी रेल्वेस्थानकाच्या परिसरात सफाई करून प्रवाशांना रेल्वेस्थानकाचा परिसर, रेल्वेगाड्यात स्वच्छता राखण्याबाबत जनजागृती केली.

ठळक मुद्देप्रवाशांमध्ये केली जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानुसार मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्या नेतृत्वात बुधवारी स्वच्छता पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला. त्यांनी रेल्वेस्थानकाच्या परिसरात सफाई करून प्रवाशांना रेल्वेस्थानकाचा परिसर, रेल्वेगाड्यात स्वच्छता राखण्याबाबत जनजागृती केली.विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाच्या प्रांगणात रेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांना स्वच्छता जागरूकता दिनाची शपथ दिली. महात्मा गांधी यांचे स्वच्छ भारताचे स्वप्न साकारण्यासाठी सर्वांनी वर्षातून १०० तास म्हणजे आठवड्यातून २ तास श्रमदान करण्याचे आवाहन केले. त्यांनी नागपूर रेल्वेस्थानकाच्या परिसरातील ऑटो पार्किंगच्या परिसरात श्रमदान करून सफाई केली. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. प्रवासादरम्यान रेल्वेस्थानक, रेल्वे परिसर, रेल्वे प्रतीक्षालय तसेच रेल्वेच्या कोचमध्ये कचरा न पसरविण्याचे आवाहन त्यांनी प्रवाशांना केले. यावेळी अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक अनुप कुमार सतपथी, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोज तिवारी यांनीही श्रमदान केले. या प्रसंगी सर्व शाखा अधिकारी, रेल्वे कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊन स्वच्छता अभियानात आपले योगदान दिले. पंधरवड्यात नागपूरसह विभागातील सर्व रेल्वेस्थानकांवर स्वच्छता जागरूकता अभियान राबविण्यात आले.दपूम रेल्वेतही स्वच्छता जागरूकता दिन साजरादक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातही स्वच्छता जागरूकता दिन विभागीय रेल्वे व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय यांच्या नेतृत्वात साजरा करण्यात आला. विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाच्या परिसरात त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. त्यानंतर बेलिशॉप रेल्वे कॉलनी, शिवमंदिर, मोतिबाग कॉलनी, अजनी मैदानापर्यंत प्रभातफेरी काढण्यात आली. विभागातील सर्व रेल्वेस्थानकांवर स्वच्छतेवर आधारित पथनाट्य सादर करण्यात आले. रेल्वे अधिकारी, कर्मचारी आणि प्रवाशांनी रेल्वेस्थानक, परिसर आणि रेल्वेगाड्यात स्वच्छता राखण्याबाबत विभागीय रेल्वे व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय यांनी जागरूकता केली.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर