शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

डेंटल विद्यार्थ्यांना वसतिगृहात कायम ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 20:44 IST

शासकीय दंत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना नवीन वसतिगृहातून बाहेर काढू नका असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. वसतिगृहातील खोल्या रिकाम्या करण्याच्या कारवाईला हरीलाल कुमावत व इतर विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाचा अंतरिम आदेश : खोल्या रिकाम्या करण्याच्या कारवाईला आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय दंत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना नवीन वसतिगृहातून बाहेर काढू नका असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. वसतिगृहातील खोल्या रिकाम्या करण्याच्या कारवाईला हरीलाल कुमावत व इतर विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने हा अंतरिम आदेश देतानाच शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठात्यांना नोटीस बजावली व यावर उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला. या प्रकरणावर आता ४ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होईल. महाविद्यालय परिसरात बांधण्यात आलेल्या दोन माळ्याच्या नवीन वसतिगृहाचे डिसेंबर-२०१७ मध्ये उद्घाटन करण्यात आले. या वसतिगृहात ३६ रहिवासी खोल्या आहेत. तळमाळ्यावर १ वाचन कक्ष, १ पालकांना भेटण्याची खोली, ३ पाहुण्यांना भेटण्याच्या खोल्या, १ कार्यालयाची खोली, १ भोजन कक्ष व १ व्यायामशाळा कक्ष आहे. निवासी खोल्यांमध्ये प्रत्येकी दोन विद्यार्थी राहणे अपेक्षित आहे. त्यापेक्षा जास्त विद्यार्थी एका खोलीत राहू शकत नाही. २४ नोव्हेंबर २०१७ रोजी ५२ विद्यार्थ्यांना या वसतिगृहात खोल्या वाटप करण्यात आल्या होत्या. एक खोली दोन विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. चालू शैक्षणिक वर्षासाठी २९ जुलै २०१८ रोजी नवीन आदेश जारी करून तीन विद्यार्थी मिळून एक खोली, याप्रमाणे केवळ ४४ विद्यार्थ्यांना खोल्या वाटप करण्यात आल्या. एवढेच नाही तर, कार्यालयाच्या खोलीसह पाहुण्यांना व पालकांना भेटण्याच्या खोल्याही विद्यार्थ्यांना राहण्यासाठी देण्यात आल्या. एम्सच्या विद्यार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी ही अव्यवस्था करण्यात आली. एम्सच्या विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या माळ्यावरील खोल्या आधीच रिक्त ठेवण्यात आल्या होत्या. आता, दंत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना वाटप झालेल्या खोल्याही रिकाम्या करून मागण्यात आल्या आहेत. अन्यथा बळजबरीने बाहेर काढण्यात येईल अशी तंबी देण्यात आली आहे. प्रशासनाची ही कृती अवैध व अन्यायकारक आहे असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. अंकुश तिरुख यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयStudentविद्यार्थी