शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

हिंगण्यात केदार विरुद्ध मेघे लढतीचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 20:58 IST

- आभार सभेत केदारांनी व्यक्त केली इच्छा : सावनेरमध्ये कोण?

कमलेश वानखेडे, नागपूर : जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत सुरू झालेली माजी मंत्री सुनील केदार व आ. समीर मेेघे यांच्यातील टसल लोकसभा निवडणुकीनंतरही थांबलेली नाही. लोकसभा निवडणुकीत हिंगणा मतदारसंघात काँग्रेसला आघाडी मिळाल्यानंतर आता केदार यांनी या मतदारसंघातून लढण्याचे संकेत दिले आहे. केदार यांच्या निकटवर्तीयांच्या मते यावेळी ते हिंगण्यातूनच लढतील व मेघे यांना आव्हान देतील.

लोकसभेच्या निकालानंतर ६ जून रोजी हिंगणा येथे काँग्रेसचे आभार सभा झाली. या सभेत माजी आ. विजय घोडमारे यांनी आता हा मतदारसंघ सजला असल्याचे सांगत येथे बाहेरून उमेदवार देऊ नका, अशी विनंती केली. यावर बोलताना केदार यांनी मी स्वत: येथून लढलो तर चालेल का, अशी जाहीरपणे विचारणा करीत या मतदारसंघात लढण्याचे संकेत दिले. मला या विधानसभा क्षेत्रात आमदार निवडून आणायचा आहे. ये मेरा ट्रेलर है. पिक्चर अभी बाकी है, असा इशाराही त्यांनी दिला होता. विशेष म्हणजे यावेळी मंचावर उपस्थित असलेल्या जि.प. उपाध्यक्ष कुंदा राऊत, उज्वला बोढारे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्यांनी उभे राहून या घोषणेचे स्वागत केले. सुरुवातीला केदारांचे हे संकेत मेघे यांना धडकी भरविण्यासाठी असावेत, असा अंदाज बाधल्या गेला. मात्र, केदार यांच्या निकटवर्तीयांनी ते हिंगणा मतदारसंघातूनच लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. केदार खरच हिंगण्यातून लढले तर सावनेरमध्ये कोण, याचीही समर्थकांना उत्सुकता असेल. 

असे आहे हिंगण्याचे राजकीय चित्र- २०१९ मध्ये हिंगणा मतदारसंघातून भाजपचे आ. समीर मेघे ४६ हजार १६७ मतांनी विजयी झाले होते.- २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात शिवसेनेला २५ हजार ९१९ मतांची आघाडी होती.- २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने येथे बाजी पलटवत १७ हजार ८६२ मतांची आघाडी घेतली.

हिंगणा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या कोट्यात- महाविकास आघाडीत हिंगणा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या कोट्यात आहे. माजी मंत्री रमेश बंग यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले. माजी आ. विजय घोडमारे यांना राष्ट्रवादीकडून येथे पराभवाला सामोरे जावे लागले. २०१४ मध्ये आघाडीत बिघाडी झाली असताना कुंदा राऊत येथून काँग्रेसकडून लढल्या होत्या. सध्या येथे राष्ट्रवादीकडून घोडमारे यांच्यासह जि.प. सदस्य दिनेश बंग, उज्वला बोढारे इच्छुक आहेत. केदारांनी संकेत दिल्यानंतर हा मतदारसंघ काँग्रेससाठी सुटतो का, याकडे लक्ष लागले आहे.

अपात्रतेच्या निकालाकडे लक्ष- जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी केदार यांना शिक्षा झाल्याने ते अपात्र झाले असून त्यांची आमदारकी रद्द झाली. दोष सिद्धीला स्थिगिती मिळावी म्हणून केदार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांच्या दोषसिद्धीला स्थगिती मिळाली तर त्यांची अपात्रता रद्द होऊ शकते व ते आगामी विधानसभेची निवडणूक लढू शकतील. त्यामुळे या निकालाकडे राजकीय वतुर्ळाचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Sunil Kedarसुनील केदार