शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील कावरापेठ रेल्वे फाटक खून प्रकरण : आरोपीची जन्मठेप कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 21:33 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खून प्रकरणातील एका आरोपीची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. ही घटना लकडगंज पोलिसांच्या हद्दीतील आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्णय

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खून प्रकरणातील एका आरोपीची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. ही घटना लकडगंज पोलिसांच्या हद्दीतील आहे.सचिन हरिनारायण पावनकर (२९) असे आरोपीचे नाव असून, तो लालगंज येथील रहिवासी आहे. या प्रकरणात सत्र न्यायालयाने पावनकर व बारईपुरा येथील मनीष देवनाथ सदावर्ते (३१) यांना जन्मठेप व ३००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. बस्तरवारी येथील दीपक गुलाब ढोबळे (३५) याला एक वर्ष कारावास व १००० रुपये दंडाची शिक्षा झाली होती. याशिवाय इतर काही आरोपींनाही शिक्षा झाली होती व काहींना निर्दोष सोडण्यात आले होते. उच्च न्यायालयाने या तीन आरोपींचे या शिक्षेविरुद्धचे अपील एकत्र ऐकले. त्यानंतर विविध बाबी लक्षात घेता, पावनकर व ढोबळेचे अपील फेटाळून त्यांची शिक्षा कायम ठेवली तर, सदावर्तेचे अपील मंजूर करून त्याला निर्दोष सोडले. न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व मुरलीधर गिरटकर यांनी हा निर्णय दिला. राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. संजय डोईफोडे यांनी कामकाज पाहिले.अशी घडली घटनामयताचे नाव सुमित श्रीवास होते. ही घटना २१ मे २०१३ रोजी रात्री ११ च्या सुमारास घडली. कावरापेठ रेल्वे फाटकाजवळ आरोपी मंगेश बिनेकरच्या मोटरसायकलचा मयत सुमितच्या मोटरसायकलला धक्का लागला. त्यामुळे सुमितने मंगेशला थापड मारली. त्यानंतर प्रकरणातील सर्व आरोपींनी सुमितवर हल्ला करून त्याचा चाकू भोसकून खून केला

 

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMurderखूनLife Imprisonmentजन्मठेप