शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

काटोल बाजार समितीच्या ८५.५ लाख रुपये शुल्काचे अपील थंडबस्त्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 18:50 IST

Nagpur : हायकोर्टाने पणन मंत्री व प्रधान सचिवांना मागितले स्पष्टीकरण

नागपूर : काटोल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ८५ लाख ५० हजार ४४ रुपये बाजार शुल्कासंदर्भातील अपील थंडबस्त्यात ठेवल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सहकार व पणन मंत्री आणि प्रधान सचिवांना नोटीस बजावून यावर येत्या ३ जुलैपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

बाजार समितीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून पणन मंत्री व प्रधान सचिव यांना हे अपील तातडीने निकाली काढण्याचा आदेश द्या, अशी विनंती केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. संबंधित बाजार शुल्क प्रिंस जिनिंग ॲण्ड प्रेसिंग फर्मकडून वसुल करणे आहे. पणन संचालकांनी यासंदर्भात २८ जून २०२३ रोजी आदेश दिला आहे. त्याविरुद्ध प्रिंस जिनिंगने ९ ऑगस्ट २०२३ रोजी पणन मंत्र्यांकडे अपील दाखल केले आहे. पणन मंत्र्यांनी ३० ऑगस्ट २०२३ रोजी त्या अपीलवर प्राथमिक सुनावणी केल्यानंतर संबंधित बाजार शुल्काला स्थगिती दिली. परंतु, तेव्हापासून त्या अपीलवर अंतिम सुनावणी करून निर्णय जाहीर करण्यात आला नाही. दरम्यान, बाजार समितीने पणन मंत्र्यांना वेळोवेळी निवेदन सादर करून अपील तातडीने निकाली काढण्याची विनंती केली, पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही. करिता, बाजार समितीने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. बाजार समितीच्या वतीने ॲड. महेश धात्रक यांनी बाजू मांडली.

बाजार शुल्क अदा करणे बंधनकारकप्रिंस जिनिंगकडे शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करण्याचे लायसन्स आहे. या लायसन्सनुसार प्रिंस जिनिंगने महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाला बाजार शुल्क अदा करणे बंधनकारक होते. ते शुल्क शेवटी बाजार समितीला परत केले गेले असते. परंतु, प्रिंस जिनिंगने १ जानेवारी २०१६ ते १५ डिसेंबर २०२१ या कालावधीत संबंधित बाजार शुल्क जमा केले नाही. बाजार समितीच्या तक्रारीनंतर विभागीय सहकारी संस्था सहनिबंधकांनी याची चौकशी करून अहवालही दिला आहे.

टॅग्स :nagpurनागपूर