शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

काटोल विधानसभा पोटनिवडणुकीला आव्हान : हायकोर्टात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 20:38 IST

काटोल विधानसभा पोटनिवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या निवडणुकीविरुद्ध काटोल पंचायत समितीचे सभापती व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप सरोदे यांनी रिट याचिका दाखल केली आहे. ऑक्टोबर-२०१९ मध्ये विधानसभेची सर्वसाधारण निवडणूक असल्यामुळे ही पोटनिवडणूक घेऊन मनुष्यबळ, वेळ, ऊर्जा व सरकारी निधी व्यर्थ घालवू नये असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. या याचिकेवर येत्या मंगळवारी न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देमंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काटोल विधानसभा पोटनिवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या निवडणुकीविरुद्ध काटोल पंचायत समितीचे सभापती व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप सरोदे यांनी रिट याचिका दाखल केली आहे. ऑक्टोबर-२०१९ मध्ये विधानसभेची सर्वसाधारण निवडणूक असल्यामुळे ही पोटनिवडणूक घेऊन मनुष्यबळ, वेळ, ऊर्जा व सरकारी निधी व्यर्थ घालवू नये असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. या याचिकेवर येत्या मंगळवारी न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी होण्याची शक्यता आहे.लोकसभेच्या सर्वसाधारण निवडणुकीसोबत काटोल विधानसभेची पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. त्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने गत १० मार्च रोजी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, ११ एप्रिल २०१९ रोजी मतदान होणार असून २३ मे २०१९ रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर जून-२०१९ मध्ये विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आहे. त्यात नवनिर्वाचित सदस्याला शपथ देण्याची व अन्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाईल. परंतु, विधानसभेची सर्वधारण निवडणूक ऑक्टोबर-२०१९ मध्ये घ्यायची असल्यामुळे सप्टेंबर-२०१९ मध्ये आदर्श आचारसंहिता जाहीर होईल. परिणामी, पोटनिवडणूक जिंकणाऱ्या उमेदवाराला आमदार म्हणून कार्य करण्यासाठी केवळ तीन महिन्याचा कालावधी मिळेल. एवढ्याकरिता मनुष्यबळ, वेळ, ऊर्जा व सरकारी निधी खर्च करणे उचित होणार नाही. तसेच, पोटनिवडणुकीनंतर मतदार व इच्छुक उमेदवारांना लगेच सर्वसाधारण निवडणुकीला सामोरे जावे लागेल. एवढेच नाही तर, २३ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या अधिसूचनेद्वारे घोषित दुष्काळग्रस्त भागात काटोल विधानसभा मतदार क्षेत्राचा समावेश आहे. ही बाब पाहताही पोट निवडणूक घेणे चुकीचे होईल असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. पोटनिवडणुकीचा कार्यक्रम अवैध घोषित करून रद्द करण्यात यावा व याचिकेवर निर्णय होतपर्यंत पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमावर स्थगिती देण्यात यावी अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे. याचिकेत भारतीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. न्यायालयात याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर कामकाज पाहतील.आशिष देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे जागा रिक्त१५ ऑक्टोबर २०१४ रोजी झालेल्या सर्वसाधारण विधानसभा निवडणुकीत काटोल मतदारसंघातून आशिष देशमुख विजयी झाले होते. त्यांनी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवली होती. दरम्यान, त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून ३ ऑक्टोबर २०१८ रोजी आमदारकीचा राजीनामा दिला. ६ ऑक्टोबर २०१८ रोजी त्यांच्या राजीनामा मंजूर झाला. त्यामुळे ही जागा रिक्त झाली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयElectionनिवडणूक