शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वकील संघटनेतर्फे कठुआ,उन्नाव घटनेचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 23:54 IST

कठुआ आणि उन्नावमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनांचे तीव्र पडसाद देशभरात उमटत असून, सर्वत्र निषेध नोंदविला जात आहे. सोमवारी नागपूर जिल्हा न्यायालयाच्या गेटसमोर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व नागपूर शहर काँग्रेस कमिटीच्या विधी विभागातर्फे देशात महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात धरणे प्रदर्शन करून निषेध नोंदविण्यात आला.

ठळक मुद्देसरकार विरोधात तीव्र संताप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कठुआ आणि उन्नावमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनांचे तीव्र पडसाद देशभरात उमटत असून, सर्वत्र निषेध नोंदविला जात आहे. सोमवारी नागपूर जिल्हा न्यायालयाच्या गेटसमोर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व नागपूर शहर काँग्रेस कमिटीच्या विधी विभागातर्फे देशात महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात धरणे प्रदर्शन करून निषेध नोंदविण्यात आला.प्रदेश काँग्रेस विधी विभागाचे अध्यक्ष अ‍ॅड. आसीफ कुरेशी यांच्या मार्गदर्शनात आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व प्रदेश सचिव अ‍ॅड. अक्षय समर्थ, शहर विभागाचे अध्यक्ष अ‍ॅड. अभय रणदिवे, महाराष्ट्र  विभागाचे अ‍ॅड. नफीस खान, अ‍ॅड. शादाब खान, अ‍ॅड. राजकुमारी राय, अ‍ॅड. रेखा बाराहाते यांनी केले. यावेळी महिला वकिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अत्याचारांच्या घटनांचा निषेध करीत सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. याशिवाय पीडितेची बाजू मांडणाऱ्या वकिलास धमकी देणाऱ्या जम्मू येथील वकील संघटनेचाही निषेध करण्यात आला. यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. आंदोलनात अ‍ॅड. प्रमोद उपाध्याय, अ‍ॅड. छायादेवी यादव, अ‍ॅड. कुलश्री भंगे, अ‍ॅड. गिरीश दादिलवार, अ‍ॅड. प्रभाकर भुरे, अ‍ॅड. श्याम शाहू, अ‍ॅड. कोकिळा लव्हात्रे, अ‍ॅड. रचना वासनिक, अ‍ॅड. अभय सुखदेव, अ‍ॅड. शेखर ढोक, अ‍ॅड. सुनीता पॉल, अ‍ॅड. रेचल राणी, अ‍ॅड. विलास तुमसरे, अ‍ॅड. रंजित सारडे, अ‍ॅड. वीरेंद्र रंगारी, अ‍ॅड. अमित बंड, अ‍ॅड. निकिता वाणी, अ‍ॅड. मनीषा सरोदे, अ‍ॅड. जयमाला लवाते, अ‍ॅड. ओ. यादव, अ‍ॅड. विलास राऊत, अ‍ॅड. मंगला वारके, अ‍ॅड. दिविशा दहिकर अ‍ॅड. सोनाली तेलंग, अ‍ॅड. मनोज मेंदुलकर, अ‍ॅड. मत्ता, अ‍ॅड. वासुदेव कापसे, अ‍ॅड. संदीप सहारे, अ‍ॅड. मोबीन खान, अ‍ॅड. विजय नारायणे, अ‍ॅड. छाया करोसिया, अ‍ॅड. जितेंद्र तिवारी, अ‍ॅड. सुरेश शिंदे, अ‍ॅड. पवन गभणे, अ‍ॅड. मनीष बडगे, अ‍ॅड. मिलिंद भोंगडे आदींचा सहभाग होता.

 

टॅग्स :Kathua Rape Caseकठुआ बलात्कार प्रकरणadvocateवकिल