शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कस्तुरबा गांधी स्वयंप्रेरित होत्या : हरिभाऊ केदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 22:36 IST

कस्तुरबा या गांधीजींची सावली होत्या हे खरे आहे; पण म्हणून कस्तुरबांचे कार्य नजरेआड करता येणार नाही. त्या स्वयंप्रेरित होत्या. आपल्या कृतीतून त्यांनी समाजाला समर्पणाचा संदेश दिला, असे प्रतिपादन माजी कुलगुरू प्रा. हरिभाऊ केदार यांनी केले.

ठळक मुद्दे१५० व्या जयंतीनिमित्त सर्वोदय आश्रमात व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कस्तुरबा या गांधीजींची सावली होत्या हे खरे आहे; पण म्हणून कस्तुरबांचे कार्य नजरेआड करता येणार नाही. त्या स्वयंप्रेरित होत्या. आपल्या कृतीतून त्यांनी समाजाला समर्पणाचा संदेश दिला, असे प्रतिपादन माजी कुलगुरू प्रा. हरिभाऊ केदार यांनी केले. राष्ट्रमाता कस्तुरबा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त बुधवारी सर्वोदय आश्रमात ‘स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीने आजच्या संदर्भात कस्तुरबा गांधी यांची प्रासंगिकता’ या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लीलाताई चितळे होत्या. केदार पुढे म्हणाले, गांधीजींनी जे सत्याचे प्रयोग केले ते जगभरात गाजले. परंतु त्या प्रयोगांच्या यशस्वीतेच्या मुळाशी कस्तुरबाच होत्या. परंपरावादी कुटुंबात जन्मूनही त्यांनी समाजाला आधुनिक व प्रगतीचा विचार दिला, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आज देशात अराजकता माजली आहे. समाज गौण झाला आणि राजकारण श्रेष्ठ ठरत आहे. संक्रमणाच्या या काळात या देशाचा सजग नागरिक म्हणून राज्यघटनेने आपल्या दिलेल्या शांतता व वैयक्तिक स्वातंत्र्याचे रक्षण आपण केले पाहिजे. हीच कस्तुरबांचीही समाजला शिकवण होती, असे विचार लीलाताई चितळे यांनी व्यक्त केले. संचालन विशाखा बागडे यांनी केले.मंगला सरोदे यांनी रंगवली स्वाभिमानी कस्तुरबाया कार्यक्रमात मंगला सरोदे यांनी ‘मी कस्तुरबा बोलतेय’ या एकपात्री प्रयोगाद्वारे स्वाभिमानी कस्तुरबा साकारली. गांधीजींच्या प्रत्येक निर्णयामागे खंबीरपणे उभी राहणारी कस्तुरबा, गांधींजी स्वातंत्र्याची लढाई लढत असताना अनेक आघाड्यांवर एकहाती लढणारी लढवय्यी कस्तुरबा, कुटुंबासाठी हळवी होणारी कस्तुरबा मंगला सरोदे यांनी मंचावर प्रभावीपणे उभी केली.

टॅग्स :nagpurनागपूरcultureसांस्कृतिक