शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कस्तूरचंद पार्कचा लूक बदलणार

By admin | Updated: November 2, 2016 02:20 IST

शहराच्या मध्यवर्ती भागातील ऐतिहासिक कस्तूरचंद पार्क चे महत्त्व विचारात घेता या मैदानाचा कायापालट करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.

नागपूर : शहराच्या मध्यवर्ती भागातील ऐतिहासिक कस्तूरचंद पार्क चे महत्त्व विचारात घेता या मैदानाचा कायापालट करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. २० नोव्हेंबर २०१६ पर्यंत विकासाचा नवीन कृती आराखडा तयार करण्यात येणर आहे. यामुळे कस्तूरचंद पार्कचा लूक बदलणार असल्याने शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. मैदानाचा वापर विविध कार्यक्रम व प्रदर्शनासाठी केला जातो. परंतु वापरानंतर मैदान पूर्ववत केले जात नाही. तसेच मैदानावर व परिसरात अतिक्रमण होते. यामुळे मैदानावर कचरा साचतो. याला आळा बसावा, यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी मंगळवारी लोकमतशी बोलताना दिली. नवीन विकास आराखड्यात मैदानाच्या वापरासंदर्भातील नियमात सुधारणा केली जाणार आहे. तसेच मैदानावर परिसरात अतिक्रमण होणार नाही. यासाठी ठोस उपाययोजना केल्या जाणार आहेत. यासोबतच परिसराचे सौंदयींकरण करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. (प्रतिनिधी)अतिक्रमण रोखण्यासाठी भरारी पथककस्तूरचंद पार्क व परिसरात व्यावसायिक मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करतात. याचा कायमचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी तहसीलदार(नझुल) यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तसेच मंडळ अधिकारी व तलाठी यांचे भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. हे पथक दर दोन- तीन दिवसांनी कस्तूरचंद पार्कची पाहणी करून अतिक्रमण होणार नाही. याची खबरदारी घेणार असल्याची माहिती सचिन कुर्वे यांनी दिली.अतिक्रमण हटविले कस्तूरचंद पार्क व लगतच्या फूटपाथवर पोहे, नारळपाणी व चहा विक्रे त्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण के ले होते. यामुळे मैदानात घाणपाणी व कचरा साचत असल्याने मैदानाला बकाल स्वरूप आले होते. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी मैदावरील अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मंगळवारी तहसीलदार (नझुल) यांच्या नेतृत्वातील पथकाने मैदानावरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. सेंट जोसेफ स्कूलच्या बाजूने कस्तूरचंद पार्क मैदानाच्या फू टपाथवर व मैदानात पोहे, नारळपाणी व चहा विक्रे त्यांनी अतिक्रमण केले होते. बाजूलाच नारळपाणी विक्रे त्यांची दुकाने होती. विक्रेते साहित्य व नारळांचा साठा ठेवण्यासाठी मैदानाचा वापर करीत होते. सर्वावर कारवाई करून मैदानाचा वापर केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.