शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

‘करजवा’ला अगदी अचूक लागली ‘कट्यार’: स्वरवेधची प्रस्तुती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:22 IST

राग यमनमधील आरोह-अवरोह असेल किंवा भैरवीची सुरेल तान. अमुक एका घराण्याचा गायक यमन गातो, म्हणून यमन श्रेष्ठ आणि तमुक एका घराण्याचा गायक भैरवी गातो म्हणून ती कनिष्ठ ठरेल का? संगीत अजरामर आहे. कारण ते कुणा एकाच्याच मालकीचे नाही, कुणाचेही दास नाही. संगीत अखंड आहे, स्वयंभू आहे, शाश्वत आहे. भौतिकतेच्या पलीकडे असे जे आहे ते संगीत सर्व भेदांपासून मुक्त आहे. हा संदेश 'संगीत कट्यार काळजात घुसली या नाटकाने नव्याने दिला.

ठळक मुद्दे संगीत नाटकांच्या रसिकमान्यतेवर नागपूरकरांची नव्याने मोहोर

आॅनलाईन लोकमतनागपूर : राग यमनमधील आरोह-अवरोह असेल किंवा भैरवीची सुरेल तान. अमुक एका घराण्याचा गायक यमन गातो, म्हणून यमन श्रेष्ठ आणि तमुक एका घराण्याचा गायक भैरवी गातो म्हणून ती कनिष्ठ ठरेल का? संगीत अजरामर आहे. कारण ते कुणा एकाच्याच मालकीचे नाही, कुणाचेही दास नाही. संगीत अखंड आहे, स्वयंभू आहे, शाश्वत आहे. भौतिकतेच्या पलीकडे असे जे आहे ते संगीत सर्व भेदांपासून मुक्त आहे. हा संदेश 'संगीत कट्यार काळजात घुसली या नाटकाने नव्याने दिला. निमित्त होते स्वरवेध नागपूर या संस्थेच्या १४ वर्षांच्या प्रवासपूर्तीचे. पुरुषोत्तम दारव्हेकरांच्या लेखणीने व पंडित जितेंद्र अभिषेकींच्या संगीताने नटलेले हे संगीतनाटक शनिवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात सादर झाले. या नाटकाला उसळलेल्या नागपूरकरांच्या गर्दीने आधुनिक मनोरंजनाच्या युगातही संगीत नाटकांच्या रसिकमान्यतेवर नव्याने मोहोर उमटवली. खाँसाहेब आफताब हुसेन यांच्या भूमिकेतील प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या अभिनयाने या नाटकाला नेहमीप्रमाणे कलास्वादाच्या एका वेगळ्या उंचीवर नेऊन संपवले. पडदा उघडला तेव्हा पंडित भानुशंकर यांची श्रीमंत हवेली बघताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर केला. हरवले मधूर मुरलीचे सूर...या नाट्यपदाने नाटकाचा प्रारंभ होतो. दोन संगीत घराण्यांतल्या संघर्षाची ही कथा नाट्यमय वळण घेत पुढे सरकत राहते. खाँसाहेबाच्या अट्टाहासापुढे त्यांना राजगायकाची पदवी मिळवून देत पंडितजींनी पत्करलेला विजनवास, त्यांची मुलगी रमाचे हवेली सोडणे, खाँसाहेबाचे हवेतील आगमन, सदाशिव गुरवचे मिरजेहून हवेलीत येणे, संगीत शिकण्यासाठीचे खेळलेले डावपेच, पंडितजींच्या गायकीपेक्षा आपली गायकी श्रेष्ठ आहे हे सिद्ध करताना स्वत:च्याच नजरेत पडत चाललेले आणि सदाशिवचे वास्तव उघड झाल्यावर एक खून माफ असतानाही हातातील कट्यार म्यान करणारे खाँसाहेब...असे सारेच प्रेक्षकांना स्तब्ध करणारे. सृष्टीच्या रचनाकाराने गाता गळा हा बरोब्बर मेंदू आणि हृदयाच्या मधोमध का ठेवलाय याचे उत्तर या नाटकाने अप्रतिम पद्धतीने दिले. आपल्या नागपूरचेच पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या सिद्धहस्त लेखणीने आणि सुबोध भावेच्या प्रयोगशील दिग्दर्शनाने या नाटकाचे सोने केले. राहुल देशपांडे यांच्यासह रमा व झरीनाच्या भूमिकेतील अस्मिता चिंचाळकर, दीप्ती माटे यांनी कमाल केली. ऋषिकेश बडवे आणि चिन्मय पाटसकर यांनीही आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला.घेई छंद मकरंद..., सूर निरागस हो..., तेजोनिधी लोहगोल...लागी करजवा कट्यार...या नाट्यपदांनी या नाटकाला संगीताचे एक अभिजात सौंदर्य बहाल केले. नाटकातील गायकांना संवादिनीवर राजेश परांजपे व तबल्यावर अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी, सचिन बक्षी यांनी सहसंगत केली.शेवटचा प्रयोग ठरला ऐतिहासिकवसंतराव देशपांडे संगीत सभा या संस्थेने या नाटकाचे अनेक यशस्वी प्रयोग केले. देश-विदेशतील मराठी प्रेक्षकांनीही या नाटकाला अक्षरश: डोक्यावर घेतले. परंतु आता या संस्थेने हे नाटक थांबविले आहे. नागपुरात शनिवारी झालेला या संस्थेचा हा शेवटचा प्रयोग होता. नागपूरकरांच्या तुफान गर्दीने हा प्रयोग या नाटकाइतकाच ऐतिहासिक ठरला.

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर