शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील  कांबळे दुहेरी हत्याकांड  : आणखी एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:36 IST

उषा आणि राशी कांबळे या आजी-नातीच्या दुहेरी हत्याकांडात पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली. अंकित शाहू (वय २२, रा. पवनसूतनगर, दिघोरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्या अटकेमुळे या हत्याकांडातील आरोपींची संख्या आता चार झाली आहे.

ठळक मुद्देआरोपींची संख्या झाली चार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उषा आणि राशी कांबळे या आजी-नातीच्या दुहेरी हत्याकांडात पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली. अंकित शाहू (वय २२, रा. पवनसूतनगर, दिघोरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्या अटकेमुळे या हत्याकांडातील आरोपींची संख्या आता चार झाली आहे.उषा सेवकदास कांबळे (वय ५४) आणि दीड वर्षीय राशी रविकांत कांबळे या दोघींची १७ फेब्रुवारीला गळा कापून हत्या करण्यात आली होती. दोघींचेही मृतदेह पोत्यात कोंबून आरोपींनी विहीरगावजवळच्या नाल्यात फेकले होते. या हत्याकांडाने सर्वत्र खळबळ उडाली होती. पोलिसांनी दुसऱ्या दिवशी मुख्य आरोपी गणेश शाहू आणि त्याची पत्नी गुडिया यांना अटक केली तर, त्याच्या एका १७ वर्षीय नातेवाईकाला ताब्यात घेतले होते. त्यांच्या घरातून रक्ताने माखलेले कपडे, काही चीजवस्तू आणि खिडकीचे पडदे जप्त केले होते. या हत्याकांडात आणखी काही आरोपी असावेत, असा दाट संशय होता. मात्र, प्रकरणाचा तपास करणारे एसीपी किशोर सुपारे यांनी संशयास्पद भूमिका वठवून अन्य आरोपींना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. प्रकरणाशी संबंधित महत्त्वपूर्ण पुरावेही त्यांनी दुर्लक्षित केली. एवढेच नव्हे तर पीडित परिवाराला धाक दाखविण्याचाही सुपारेंनी उद्दामपणा केला. त्यामुळे त्यांना या प्रकरणाच्या तपासातून दूर करण्याची मागणी पत्रकारांनी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्याकडे केली. सुपारेंच्या संशयास्पद भूमिकेचे किस्सेही पत्रकारांनी आयुक्तांना ऐकविले. त्याची दखल घेत आयुक्तांनी सुपारेंकडून या तपासाची सूत्रे काढून ती एसीपी राजरत्न बनसोड यांच्याकडे सोपविली होती. बनसोड यांनी नव्याने या प्रकरणाची सूक्ष्म चौकशी सुरू केली. त्यात महत्त्वपूर्ण पुरावे हाती आल्यानंतर त्यांनी गणेश शाहूचा लहान भाऊ अंकित शाहू याला गुरुवारी चौकशीसाठी बोलवून घेतले. त्याची तीन ते चार तास कसून चौकशी केल्यानंतर रात्री अंकितला अटक करण्यात आली.----एसीपी सुपारेंना का दिसले नाही?अंकित शाहू उषा आणि राशी यांच्या हत्याकांडात प्रत्यक्ष सहभागी होता. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठीही त्याने मदतकेल्यासंबंधीचे ठोस पुरावे मिळाल्यामुळेच अंकितला अटक करण्यात आल्याची माहिती संबंधित पोलीस सांगतात. त्यामुळे हे पुरावे यापूर्वी तपास करणारे एसीपी सुपारे यांना का दिसले नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

टॅग्स :MurderखूनArrestअटक