शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कोमावार यांच्याकडे प्रभारी कार्यभार

By admin | Updated: August 27, 2014 00:57 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक विलास रामटेके यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रभारी कार्यभार कोणाकडे द्यायचा यासंदर्भात प्रशासनासमोर मोठा प्रश्न निर्माण

नागपूर विद्यापीठ : १५ सप्टेंबरपर्यंत सोपविली परीक्षा नियंत्रकपदाची जबाबदारीनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक विलास रामटेके यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रभारी कार्यभार कोणाकडे द्यायचा यासंदर्भात प्रशासनासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. ‘बीसीयूडी’ संचालक (बोर्ड आॅफ कॉलेज अ‍ॅन्ड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेन्ट) डॉ.श्रीकांत कोमावार यांच्याकडे परीक्षा नियंत्रकपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ही जबाबदारी केवळ १५ सप्टेंबरपर्यंतच असल्याने त्यानंतर काय हा प्रश्न मात्र कायमच आहे.विद्यापीठातील एकूण राजकारणाला कंटाळून विलास रामटेके यांनी मुंबई येथील जे.जे.स्कूल आॅफ आर्किटेक्चर येथे ‘प्रोफेसर’ म्हणून रुजू होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अगोदरच निकालांच्या खोळंब्यामुळे अडचणीत सापडलेल्या परीक्षा विभागाचा प्रभारी कारभार तातडीने कोणत्या अधिकाऱ्याकडे द्यायचा यासंदर्भात पेच होता. डॉ.पूरण मेश्राम व प्रशांत मोहिते या दोघांचे नाव यासाठी आघाडीवर होते. प्रशासनाने डॉ.सिद्धार्थ काणे यांनादेखील यासाठी विचारणा केली होती. काणे यांच्याकडे परीक्षा विभागाचा अनुभवदेखील आहे परंतु काणे यांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिला.अखेर ‘बीसीयूडी’ संचालक डॉ.श्रीकांत कोमावार यांच्याकडे परीक्षा नियंत्रकपदाचा प्रभारी कार्यभार देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात विद्यापीठाचे प्रसिद्धी समन्वयक श्याम धोंड यांच्याशी संपर्क साधला असला त्यांनी या घडामोडीस होकार दिला. डॉ.कोमावार यांनी मंगळवारी सायंकाळी विलास रामटेके यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. परंतु १५ सप्टेंबरनंतर कोणाकडे ही धुरा जाणार याबाबत अद्यापही काही स्पष्ट होऊ शकलेले नाही. दरम्यान, येत्या काही दिवसांतच पूर्णवेळ परीक्षा नियंत्रक नियुक्तीसाठी प्रशासकीय प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे असेदेखील सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)प्रभारी कुलगुरूंना मिळणार मुदतवाढ?तत्कालीन कुलगुरू डॉ.विलास सपकाळ यांच्या राजीनाम्यानंतर विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्याकडे कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. दरम्यान, विद्यापीठासमोरील अडचणी, ‘नॅक’ समितीचा प्रस्तावित दौरा, शंभरावा दीक्षांत समारंभ इत्यादी बाबी लक्षात घेता अनुपकुमार यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.