प्रशासकीय मंजुरी : २७ कोटी रुपयांचा निधी मंजूर नागपूर : अतिवृष्टी व संततधार पावसामुळे कामठी - मौदा विधानसभा मतदारसंघातील विविध रस्ते व पुलांची दैनावस्था झाली आहे. सदर रस्ते व पुलाच्या विशेष देखभाल व दुरुस्तीसाठी २७ कोटी ४१ लाख ५० हजार रुपयांचा निधी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर केल्याची माहिती आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. या संदर्भात बावनकुळे यांनी सांगितले की, या रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने २७ आॅगस्ट रोजी सदर निधीला मंजुरी प्रदान केली आहे. या निधीतून नागपूर (ग्रामीण) तालुक्यातील हुडकेश्वर - मटकाझरी रस्त्याचे (३५ किमी) मजबुतीकरण व डांबरीकरण २ ते ३, हुडकेश्वर - मटकाझरी रस्त्याचे (३५ किमी) मजबुतीकरण व डांबरीकरण ६ ते ८, हुडकेश्वर - मटकाझरी रस्त्याचे (३५ किमी) मजबुतीकरण व डांबरीकरण ८ ते १०, मानेवाडा - बेसा - पेवठा - बनवाडी - मंगरूळ - तुमडी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण (किमी १७ ते १९), शंकरपूर - वेळा -कन्हाळगाव - हुडकेश्वर - अड्याळी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण २ ते ४ (शंकरपूर - वेळा), शंकरपूर - वेळा -कन्हाळगाव - हुडकेश्वर - अड्याळी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण ४ ते ५ (वेळा - खरसोली) या रस्त्यांसाठी प्रत्येकी ५० लाख रुपयांप्रमाणे चार कोटी मंजूर करण्यात आले. कामठी तालुक्यातील उमरगाव - पांढरकवडा - टेमसना - दिघोरी (बु), दिघोरी (खु) - गारला - परसाड - सेलू - वडोदा, एकर्डी - सेलू - चिखली - झरप - भूगाव मार्गांतर्गत चिखली ते झरप आणि एकर्डी - सेलू - चिखली - झरप मार्गांतर्गत झरप ते भूगाव या रस्त्यांच्या विशेष दुरुस्तीसाठी प्रत्येकी ५० लाख रुपयांप्रमाणे तीन कोटी रुपये मंजूर केले आहे. कामठी -कळमना मार्गासाठी ६३ लाख, कामठी - वडोदा आसलवाडा - जाखेगाव - रस्त्यासाठी १ कोटी ७५ लाख, कामठी - आसलवाडा - जाखेगाव रस्त्यासाठी १ कोटी ४० लाख, बाभुळखेडा - लोणखैरी - कोराडी - सुरादेवी - वारेगाव रस्त्यासाठी १ कोटी २२ लाख ५० हजार, वडोदा - भामेवाडा रस्त्यासाठी ३५ लाख, कामठी - घोरपड - लिहिगाव रस्त्यासाठी ५० लाख, कामठी - वारेगाव मार्गावरील नालीच्या बांधकामासाठी १० लाख असा एकूण १८ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मौदा तालुक्यातील कोटगाव- चिरव्हा - मारोडी - धामणगाव - मांगली - चारभा - पिपरी - खंडाळा -धुर्मापुरी मार्गासाठी ५० लाख, लापका - कोराड - धानला - दहेगाव - भोवरी - चिखलाबोडी - रस्त्यासाठी ५० लाख रुपये मंजूर केले आहे. रामटेक - मौदा वळणमार्गाच्या सुधारणेसाठी ३० लाख,या मार्गावरील नालीसाठी ३५ लाख, मौदा - लापका - धामणगाव रस्त्यावरील नालीसाठी पाच लाख, पोटमारा - पानमारा - धामणगाव - मांगली (तेली) - रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीच्या बांधकामासाठी पाच लाख रुपये मंजूर केले आहे. (प्रतिनिधी)
कामठी, मौदा नागपूर तालुक्यातील रस्ते चकाकणार
By admin | Updated: September 2, 2014 01:12 IST